01:41am | Sep 01, 2018 |
सातारा : गेली चार वर्षांपासून राज्यातील महामंडळे, मंडळे व प्राधिकरणाच्या रिक्त पदांवर अखेर राज्य शासनाने अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापती अशा 21 नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील आ. नरेंद्र पाटील, शिवसेनेचे उपनेते नितीन बानुगडे पाटील व माण तालुक्यातील सदाशिवराव खाडे यांची वर्णी लागलेली आहे.
राज्य शासनाने विविध विकास महामंडळे, मंडळे व प्राधिकरणांच्या रिक्त 21 जागांवर आज दि. 31 रोजी नियुक्त्या जाहीर केल्या. या नियुक्त्यांमध्ये 10 महामंडळे, सहा मंडळे व दोन प्राधिकरण व एका आयोगातील पदाचा समावेश आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील माथाडी नेते तथा विधानपरिषद आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांची अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी, शिवसेनेचे उपनेते तथा शिवव्याख्याते नितीन बानुगडे पाटील यांची कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी, तर माण तालुक्यातील व सध्या पिंपरी चिंचवड येथे भाजपचे नेते असलेल्या सदाशिवराव खाडे यांची पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 2014 च्या विधानसभा व लोकसभा निवडणुकांमध्ये कॉंग्रेस व राष्ट्रवादीने सपाटून मार खाल्ल्यामुळे सातारा जिल्हा राजकीय विजनवासात गेला होता. जिल्ह्यातील महादेवराव जानकर सध्या राज्यमंत्रीमंडळात कॅबिनेट मंत्री आहेत. मात्र त्यांचा जिल्ह्याशी फारसा संबंध येत नाही. सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी शेखर चरेगावकर, तर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या अध्यक्षपदी डॉ. अतुल भोसले आहेत. असे असताना आज जिल्ह्यातील तिघांना महामंडळ व प्राधिकरणाची पदे मिळाल्यामुळे जिल्ह्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, सुमारे चार वर्षानंतर का होईना राज्य सरकारने महामंडळे, मंडळे व प्राधिकरणाच्या रिक्त पदांवर नियुक्त्या केल्यामुळे राज्यातील अडगळीत पडलेल्या अनेक पुढार्यांचे यानिमित्ताने पुनर्वसन झाले आहे.
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |