खंडाळा : खंडाळा तालुक्यातील पारगाव याठिकाणी असणाऱ्या स्मशानभूमीजवळ असणाऱ्या एका पडीक शेतामध्ये अवैधरित्या साठा केलेला डांबराचा साठा खंडाळा पोलीसांनी मोठ्या शिताफीने जप्त केला आहे.
दरम्यान, खंडाळा पोलीसांच्या धडक कारवाईनंतर अवैध डांबर साठवणुकी करणारा मुख्य आरोपी फरार झाला असून खंडाळा पोलीस त्याचा शोध घेत आहे. या घटनेमुळे खंडाळा तालुक्यात खळबळ उडाली आहे.
याबाबतची खंडाळा पोलीसांनी दिलेली माहिती अशी कि, पारगाव ता.खंडाळा येथील स्मशानभूमीजवळ असणाऱ्या एका पडीक शेतामध्ये चोरीचा डांबराचा साथ असल्याची माहिती खंडाळा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांना मिळाली. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार गिरीश भोईटे, संजय धुमाळ , प्रशांत धुमाळ, तुषार कुंभार, संजय थोरवे , होमगार्ड धायगुडे व जिल्हा विशेष शाखेचे पोलीस हवालदार श्रीधर शेलार यांनी संबंधित ठिकाणी सापळा रचला असता त्याठिकाणी दादा मुकिंदा गायकवाड रा.खंडाळा यांच्या मालकीच्या पडीक शेतामध्ये झाडाझुडपांच्या आडोश्याला लोखंडी बॅरल व आसपासच्या परिसरात डांबर पडल्याचे निदर्शनास आले.
दरम्यान, संबंधित डांबराचा अवैध साठा हा खंडाळा येथील सनी उर्फ गुरुदयाल कुलबतसिंग छपरी याने केला असल्याचे खंडाळा पोलीसांच्या प्राथमिक तपासामध्ये निदर्शनास आले. यावेळी खंडाळा पोलीसांनी २ लाख ८८ हजार रुपये किमतीचे ३६ निळ्या रंगाचे डांबराचे बॅरल ,१ हजार ५०० रुपये किमतीचे ३ मोकळे लोखंडी बॅरल , नरसाळे, असा २ लाख ८९ हजार ६३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.दरम्यान, खंडाळा पोलीसांची कारवाईची चाहूल लागताच सनी उर्फ गुरुदयाल छपरी हा फरार झाला आहे. खंडाळा पोलीसांनी वर्तविलेल्या प्राथमिक अंदाजानुसार संबंधित डांबराचा साथ चोरीचा असन्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने खंडाळा पोलीस तपास करीत आहे.या घटनेची फिर्याद पोलीस हवालदार प्रशांत धुमाळ यांनी शिरवळ पोलीस स्टेशनला दिली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार एन.बी.नलावडे हे करीत आहे.
जिल्ह्यात 5105 पाणी स्त्रोतांची तपासणी |
आयुर्वेदिक गार्डनचा वॉकिंग ट्रॅक सुरू करण्याची मागणी |
तरुणांनी उद्योगविश्वात गरुड झेप घ्यावी |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एकास मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |
साताऱ्यात इयत्ता १२ वीच्या परीक्षेत मुलींची बाजी |
वडूज पंचायत समितीचा विस्तार अधिकारी लाच लुचपतच्या जाळ्यात |
खिडकीचे गज वाकवून लॅपटॉपची चोरी |
रामाचा गोट येथून युवक बेपत्ता |
विरळी येथे युवकाची आत्महत्या |