सातारा : देशभरात तसेच राज्यात कोरोंनाग्रस्तांची संख्या वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री तसेच कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी मतदारसंघातील सरपंचांशी फोनवरून संवाद साधत गावातील सद्य परिस्थितीची माहिती घेतली. तसेच शासनाने सरपंचांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक गावात स्थापन केलेल्या समित्यांच्या बाबतीत कश्या पद्धतीने कामकाज सुरू आहे याचीही माहिती घेतली.
याचसोबत शासनाच्या योजनांबद्दल सरपंचांना माहिती दिली. गावात ज्या लोकांकडे दारिद्र्य रेषेखालील कार्ड आहे अश्या लोकांना ५ किलो राशन मोफत मिळणार आहे तसेच उज्वला योजनेमार्फत 3 महिन्यात ३ गॅसच्या टाक्या मोफत मिळणार आहेत अश्या काही शासकीय योजनांची माहिती आमदार चव्हाण यांनी सरपंचांना दिली. गावातील लोकांना या योजनांचा फायदा व्हावा यासाठी प्रयत्न करावेत तसेच कोरोनाबद्दल ग्रामस्थांमध्ये जागृती व्हावी या उद्देशाने ग्रामपंचायतींकडून विविध उपक्रम राबविले जावेत अशाही सूचना त्यांनी सरपंचांना दिल्या व गावात कोणतीही अडचण आल्यास त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
आमदार पृथ्वीराज चव्हाण सद्य परिस्थितीबद्दल राज्यातील सचिवांसोबत रोज बोलून राज्याचा आढावा घेत आहेत तसेच त्यांना उपयुक्त अशा सूचना सुद्धा देत आहेत. याचसोबत आमदार चव्हाण हे सातारा जिल्ह्यातील आढावा घेण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस प्रमुख तसेच आरोग्य अधिकारी यांच्याशी सुद्धा वेळोवेळी फोनवरून संवाद साधत चालू घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून आहेत. याच संवादाचा भाग म्हणून आज त्यांनी मतदारसंघातील सर्व सरपंचांशी फोनवरून संवाद साधला, या सरपंचांच्या संवादाला सर्वच सरपंचांनी उत्साहाने प्रतिसाद दिला.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |