सातारा : सातारा एसटी स्टँडसमोरील भाजी मंडईमध्ये रविवारी अज्ञात चोरट्यांनी धुडगूस घालत 80 हजार रुपये किंमतीचे 6 मोबाईल चोरी केले. अवघ्या दीड तासात मोबाईलवर हा डल्ला मारला गेला असून भाजी खरेदीसाठी आलेल्यांमध्ये संतापाची लाट उसळली. दरम्यान, शाहूपुरी पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
अरविंद दत्तात्रय अवसारे (वय 45, रा. संभाजीनगर) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार हे रविवारी सकाळी भाजी घेण्यासाठी एसटी स्टॅन्डसमोरील मंडईत गेले होते. भाजी खरेदी करत असताना अज्ञाताने गर्दीचा गैरफायदा घेवून त्यांच्या खिशातील 12 हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरी केला. मोबाईल चोरीची घटना समोर आल्यानंतर तक्रारदार यांनी परिसरात शोधाशोध केली. मात्र, मोबाईल आढळला नाही.
दरम्यान, त्याचवेळी आणखी पाच जणांचे महागडे मोबाईलही चोरी झाल्याचे समोर आले. एकाचवेळी अवघ्या दीड तासात 6 मोबाईल मंडईमध्ये चोरी झाल्याचे समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. सर्व तक्रारदार यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. सर्व तक्रारदार यांनी मोबाईलची माहिती दिल्यानंतर ते 80 हजार रुपयांचे होते. पोलिसांनी सर्वांची तक्रार ऐकूण अज्ञाताविरुध्द मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल केला.
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |

विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |