01:05am | May 05, 2019 |
सातारा : तासवडे (ता.कराड) येथील सुप्रिम डिस्टीब्युटर्स व ओयासीस बिव्हरेजस या दोन कंपन्यांवर अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाई केली. या कारवाईत सुमारे ५६ हजार रूपये किंमतीच्या सिलबंद पाण्याच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. अन्न व औषध प्रशासनाच्या या कारवाईमुळे सिलबंद पाण्याची विक्री करणार्या डिस्टीब्युटर्सचे धाबे दणाणले आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी, गेल्या दोन ते तीन महिन्यापासून कडक उन्हाळा जाणवू लागला आहे. त्यामुळे बाजारात ग्राहकांकडून सिलबंद पाण्याच्या बाटल्याची मागणीही वाढू लागली आहे. सध्या बाजारात विविध कंपन्यांच्या पाण्याच्या बाटल्या विक्रीसाठी ठेवल्या जात असतात. परंतू, या पाण्याची गुणवत्ता ग्राहकांना समजून येत नाही. अशातच काही कंपन्या निकृष्ट दर्जाच्या व शरीरास अपायकारक ठरणार्या पाण्याची राजरोस विक्री करीत असल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात नुकतीच अन्न व औषध प्रशासन सातारा विभागाकडे दाखल झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने प्रशासनाने दिनांक १८ एप्रिल रोजी तासवडे येथील मे.सुप्रीम डिस्टीब्युटर्स व ओयासीस बिव्हरेजस या दोन कंपन्यांवर कारवाई करीत सिलबंद पाण्याच्या बॉटल्स तपासणीसाठी जप्त केल्या आहेत. सुप्रिम डिस्टीब्युटर्सच्या सुमारे ४८ हजार ३५२ रूपयांच्या ६ हजार ४४ पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या व मे.ओयासीस बिव्हरेजस या उत्पादक कंपनीच्या ८ हजार ४०० रूपयांच्या १ हजार ३४४ पिण्याच्या पाण्याच्या सिलबंद बाटल्या जप्त केल्या आहेत. दोन्ही कंपन्यांच्या सुमारे ५६ हजार ७५२ रूपयांचा अन्नपदार्थांचा साठा जप्त केला आहे. या पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी रो.रा.शहा व आर.एम.खंडागळे यांनी केली
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |