03:32pm | Aug 15, 2019 |
कराड : सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल कराड तर्फे पूरग्रस्तांसाठी वैद्यकीय सहाय्यता उपक्रम राबवण्यात आला.महाराष्ट्र ते केरळ या द्वीपकल्प प्रदेशाला (पेनिनसुलर रिजन) महापूराने ग्रासले असून कराड, कोल्हापूर व सांगली येथे गंभीर पूर परिस्थिती निर्माण झाली आहे आणि आता जसे पाणी ओसरायला लागले तसे पूरपरिस्थितीनंतर उद्भवणार्या रोगांचे आव्हान समोर उभे राहिले आहे.यावर वेळीच नियंत्रण मिळविल्यास यामुळे होणारा रोगांचा प्रभाव आपण कमी करू शकतोे. हेच विचार लक्षात घेत सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल,कराडने पुरग्रस्तांची मोफत वैद्यकीय तपासणी करून रोगप्रतिबंधासाठी औेषध वाटप केले . या उपक्रमामध्ये डॉक्टरांच्या विविध तुकड्या तयार करण्यात आल्या दि. 11 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट दरम्यान दुशेरे, कोळे, रेठरे हरणाक्ष, साजुर, पोतले, अटके, जाधव मळा, रेठरे-वाठार, पाटण, नावडी, रामपूर या गावांमध्ये वैद्यकीय सेवा पुरविण्यात आल्या. या उपक्रमामध्ये एकूण 1000 हुन अधिक पुरग्रस्तांची तपासणी करून औषधे देण्यात आली.
याविषयी माहिती देताना सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल कराडचे प्रमुख डॉ वेंकटेश मुळे यांनी सांगितले की, पुराच्या पाण्याने आपल्या आरोग्यावर तात्काळ परिणाम होत असतो. पुरपरिस्थितीत विस्थापित होणे व जीवनमान खालावणे यामुळे देखील आरोग्यावर र्दीर्घकालीन परिणाम होतात. टायफॉईड,कॉलरा,हेपॅटायटिस (कावीळ), लेप्टोस्पायरोसिस, त्वचा विकार हे दुषित पाण्यामुळे तर डेंग्यु,मलेरिया,ताप हे हवामान बदलामुळे होणारे रोग पूरस्थितीत झपाट्याने वाढतात. पाणी ओसरल्यावर या रोगांचा झपाट्याने फैलाव होण्याचा धोका असतो, म्हणूनच अशा परिस्थितीतून रोगांवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे असते. वेळीच मिळालेले औषध उपचार, संभाव्य गंभीर आजारांना आळा घालते. या हेतूनेच आम्ही डॉक्टरांची विविध पथके तयार करून हा वैद्यकीय उपक्रम राबविला. सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही हा वैद्यकीय मदतीचा हात पुढे सरसावला आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |