01:22am | Dec 05, 2018 |
सातारा : पेट्रोलपंपासह ठिकठिकाणी एटीएम कार्डचा वापर करुन स्वॅप मशीनद्वारे फसवणूक करणार्या नाशिक येथील 6 जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषन विभाग व वाठार पोलिसांनी गजाआड केले. एटीएमद्वारे नव्यानेच अशा पध्दतीने गुन्हे होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून संशयितांनी लोणंद, फलटण, बारामती, जेजुरीसह इतर जिल्ह्यातही एटीएम स्वॅप फ्रॉड केला असल्याची माहिती आहे. दरम्यान, स्वॅप मशीनद्वारे व्यवहार झाल्यानंतर सर्वांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
विजय धोंडीराम सुर्यवंशी (रा. 29, रा.पंडीतनगर, सिडको), योगेश नामदेव काळे (वय 27, रा.अंबड), अश्पाक दस्तगीर शेख (वय 30, रा.सिडको), देविदास कचरु शिंदे (वय 28, रा.सातपूर रोड), लक्ष्मीकांत केशवराव पाटील (वय 50, रा.चेतनानगर, राणेनगर सर्व नाशिक) व निलेश अनंत ब्राम्हण/ भिडे (वय 30, रा.पिंपराळ गावठाण जि.जळगाव) अशी अटक केलेल्या टोळीतील संशयितांची नावे आहेत.
अप्पर पोलिस अधीक्षक धिरज पाटील यांनी पत्रकार परिषद घेवून याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले, वाठार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील स्वामी पेट्रोलपंपावर काही अज्ञातांनी एटीएम कार्डचा वापर करुन पेट्रोल पंपावरील स्वॅप मशीनद्वारे 6000 हजार रुपये भरले. मात्र स्वॅप मशीनमधील सेटींगमधून झालेला व्यवहार रद्द करुन पुन्हा स्वत:च्या नावावर 6000 हजार रुपये जमा करुन घेतले. याप्रकरणाची तक्रार सदाशिव मल्लीशम बेलगुंफे (वय 43, रा.वाठार स्टेशन) यांनी पोलिस ठाण्यात दिली आहे. पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी या गुन्ह्यासंबंधी पोलिस अधिकार्यांना तपासाच्या सूचना केल्या.
एलसी व वाठार पोलिसांनी संयुक्तरित्या तपासाला सुरुवात केल्यानंतर या टोळीबाबत माहिती मिळाली. पोलिसांनी तत्काळ संशयितांना मंगळवारी ताब्यात घेवून त्यांच्याकडे प्राथमिक चौकशी केल्यानंतर त्यांनी एटीएम कार्ड वापरुन स्वॅप मशीनद्वारे हातचलाखीने फसवणूक केल्याची कबुली दिली. संशयितांची झडती घेतली असता त्यांच्याकडून वेगवेगळी एटीएम कार्ड व रोख 1 लाख 32 हजार रुपये जप्त केले. संशयितांनी अनेक ठिकाणी अशाचप्रकारे फसवणूक केल्याची कबुली दिली असून जप्त केलेली रक्कम ही फसवणूकीतील असल्याची कबुली त्यांनी दिली आहेे.
पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक धिरज पाटील, पोनि विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विकास जाधव, मारुती खेडकर, फौजदार महेश पाटील, पोलिस हवालदार सुर्यकांत जाधव, अतुल कुंभार, अजय झुंझार, सचिन जगताप, रवि वाघमारे, संतोष जाधव, निलेश काटकर, गणेश कचरे यांनी कारवाईत सहभाग घेतला.
सातारा शहरातील तीन कॅफेंवर कारवाई; 9 जणांवर गुन्हे |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |