सातारा : महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दोघेही धर्मनिरपेक्ष भारतीय राष्ट्रवादाचे शिल्पकार आहेत. त्यांच्यामध्ये वैचारिक मतभेद असले तरी मतभेद अजिबात नव्हते असे मत जेष्ठ अभ्यासाक शिवाजी विद्यापिठाच्या सामाजिक शास्त्र विभागाच्या डीन व राज्यशास्त्र विभागाच्या माजी प्रमुख प्रा. डॉ. भारती पाटील यांनी व्यक्त केले आहे.
येथील संबोधी प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या ३२ व्या वर्षाच्या थोरांच्या स्मृती व्याख्यानमालेत गांधी आंबेडकर समजून घेताना या विषयावर त्या बोलत होत्या. विचार मंचावर प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष दिनकर, आजीव सभासद प्रा. सुवर्णा विनोद यादव उपस्थित होत्या. शिवाजी विद्यापीठ उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रा. भारती पाटील यांचा या प्रसंगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राचार्य अण्णासाहेब होवाळे यांच्या हस्ते तसेच त्यांच्या सातारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
डॉ. भारती पाटील म्हणाल्या, देशात सध्या पाशवी धर्मांध शक्तीच्या उन्मादाचे राजकारण बोकाळत आहे. अशावेळी गांधी आंबेडकर यांची परस्पर पूरकता परिवर्तनवादी समाज घटकांनी समजून घेण्याची व आपापसातील मतभेदाच्या शृंखला तोडून समन्वयाची भूमिका घेऊन एकत्रितपणे सद्य परिस्थितीत धर्मनिरपेक्ष लोकशाहीच्या रक्षणासाठी काम करण्याची गरज आहे.
महात्मा गांधी व डॉ. आंबेडकरांच्या राजकीय कार्याची सुरुवात एकाचवेळी १९२० मध्ये झाली व देशाचा परस्पर पूरक असा इतिहास घडविला आहे. मानवी जीवनातील धर्माचे महत्व व नैतिक अधिष्ठान याबाबत दोघांचे एकमत होते. भारताचे स्वातंत्र्य हेच अंतिमतः दोघांचे उद्दिष्ट होते. बाबासाहेबांची प्रकांड बुद्धिमत्ता लक्षात घेऊन त्यांच्यावर राज्यघटना तयार करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. त्याचे श्रेय म. गांधींना द्यावे लागेल. दोघेही राजकीय नेते समाज सुधारक, पत्रकार व प्रचंड लोकसंग्रह जमविण्याची क्षमता असलेले होते. त्यांच्या शिवाय देशातील अन्य नेत्यांना त्यांच्या एवढे लोकसमुदाय जमवता आलेले नाहीत. त्यांचे रस्ते वेगवेगळे असले तरी अस्पृश्यता निवारण हे एकच धेय्य होते.
पुणे करार हा दोघांमध्ये संघर्षाचा मुद्दा होता. २४ सप्टेंबर १९३२ रोजी पुणे करारात समेट झाल्यानंतर म. गांधीमध्ये आमूलाग्र बदल झाला. त्यांनी अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण संघाची स्थापना केली. हरिजन सेवक संघात त्याचे रूपांतर केले. बाबासाहेबांना त्याचे सदस्य करून घेतले. आंतरजातीय लग्नाशिवाय कोणत्याही लग्नास उपस्थित न राहण्याचा निर्णय केला. त्यांच्यामध्ये हे स्थित्यंतर लक्षणीय स्वरूपाचे आहे. डॉ. आंबेडकरांनी महाडच्या चवदार तळे सत्याग्रह करताना म. गांधींचा फोटो ठेवला होता. वैचारिक मतभेद असताना वैरभाव न बाळगता दोघांनीही एकमेकांची प्रतिष्ठा जपलेली आहे. प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष केशवराव कदम यांनी आभार मानले. कार्यक्रमास लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |