03:53pm | Mar 30, 2019 |
सातारा : सातारा शहराच्या त्रिशंकु भागातील गटराच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेले महिने साईबाबा मंदिरापासून आण्णासाहेब कल्याणी शाळेकडे जाणार्या रस्त्यावरच गटराचे पाणी साचल्याने परीसरात दुर्गंधी पसरली आहे. शाळेतील मुंलाना या गटराच्या पाण्यातूनच नाक मुठीत धरून जावे लागत आहे. नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. खासदार, आमदारांचेही याकडे दुर्लक्ष होत आहे. रस्त्यावरू वहाणार्या गटराच्या पाण्याचा बंदोबस्त करण्याकडे सातारा पालिकेसह देशात स्वच्छतेचा डंका पिटणार्या सातारा जिल्हा परीषदेचेही दुर्लक्ष होत आहे. या ठिकाणी अनेकजण पडून जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान या गटराच्या पाण्याचा बंदोबस्त झाला नाहीतर लोकसभा मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय नाईलाजास्तव घ्यावा लागेल असा इशारा या परीसरात रहीवासी नागरीकांनी बोलताना दिला आहे.
त्रिशंकु भागातील नागरीकांनी बोलताना सांगीतले की, गोडोली, कर्मवीर हौसिंग सोसायटी, सातारा गृह निर्माण सोसायटी असे अनेक भाग सातारा शहरालगत असले तरी पालिका हद्दीत यांचा समावेश झालेला नाही. त्यामुळे सातारा पालिका या त्रिशंकु भागातील नागरीकांच्या गटर, पाणी, रस्ते आदी सुविधांकडे दुर्लक्ष करीत असते. त्यामुळे त्रिशंकु भागात मोठे बंगले उभे राहिले मात्र या ठिकाणी रस्ते, गटर, वीज अशा सुविधा मिळाल्या नसल्याने त्रिशंकु भागातील नागरीकांना अनेक बाबींना सामोरे जावे लागत आहे.
साईबाबा मंदिरापासून आण्णासाहेब कल्याणी शाळेकडे जाणार्या रस्त्याच्या कडेला कर्मवीर हौसिंग सोसायटी, सातारा गृह निर्माण सोसायटी आहेत. या दोन्ही सोसायट्या पालिका हद्दीत येत नाहीत. त्रिशंकु भागात यांचा समावेश असल्याने या सोसायटीचे गटराचे पाणी रस्त्यावररून वहात आहे. रस्त्यावर गटराच्या पाण्याचे डबके साचले आहे. त्यामुळे या परीसरात डासांचा प्रार्दुभाव वाढला आहे. या गटराच्या साचलेल्या डबक्यापासून आण्णासाहेब कल्याणी शाळा अगदी हाकेच्या अंतरावरच आहे. त्यामुळे या गटराच्या पाण्याची दुर्गंधी शाळे पर्यंत पसरली आहे. शाळेत जाणार्या मुलांना व पालकांना, पादचार्यांना या परीसरातून जाताना नाक मुठीत धरून गटराच्या साचलेल्या पाण्यातून जावे लागते. अशावेळी एकादे वहान जर गेले तर रस्त्यावरील डबक्यातील पाणी अंगावर उडत आहे. अनेकवेळा गोडोली भागाचे नगरसेवक शेखर मोरे-पाटील यांच्याकडे व पालिककडे नागरीकांनी तक्रारी केल्या. मात्र तक्रारींची दखल घेतली जात नाही. पालिका म्हणते हा परीसर आमच्या हद्दीत येत नाही. त्यामुळे आम्ही सुविधा पुरवू शकत नाही. यानंतर सातारा पंचायत समितीचे सदस्य आशुतोष चव्हाण यांच्याकडेही तक्रारी केल्यातरी त्यांच्याकडून गटराच्या पाण्याची विल्हेवाट लावण्यासंदर्भात दखल घेतली जात नाही.
रस्त्यावरून वहाणार्या गटराच्या पाण्यामुळे आमच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असतानाही सातारा पालिका, सातारा पंचायत समिती या सरकारी यंत्रणांना जाग येत नाही. त्रिशंकु भागातील जनतेने सातारा पंचायत समिती सदस्य व नगरसेवकांना निवडूण दिले तरी आमच्या प्रश्नाची दखलच घेत नाहीत. खासदार, आमदारांचेही याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीला मतदान न करता बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेणार आहे, असे यावेळी संतप्त नागरीकांनी बोलताना सांगीतले.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |