07:04pm | Aug 11, 2018 |
सातारा : मुंबईतील नालासोपार्यात परवा राज्य दहशतवाद विरोधी पथकाने कारवाई करुन मोठ्या प्रमाणावर विस्फोटके जप्त केली होती. या प्रकरणी एटीएसने वैभव राऊतला अटक केली होती. वैभवच्या चौकशीमध्ये शरद कळस्कर व सातार्यातील सुधन्वा गोंधळेकर यांची नावे समोर आली होती. सुधन्वा गोंधळेकर याचे नाव समोर आल्यानंतर सातार्यात एकच खळबळ उडाली होती.
येथील करंजे परिसरामधील झेंडा चौकात सुधन्वा गोंधळेकर याचे घर आहे. लहानपणापासूनच सुधन्वा शाळेत हुशार होता. पुढील शिक्षणासाठी सुधन्वाने पुणे येथील गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. शिकत असताना रॅगिंग प्रकारातून सुधन्वाने त्याचा सहअध्यायी असलेल्या मुलाचा खून केला होता. त्यावेळी पोलिसांनी खुनाच्या प्रकरणात त्याला अटकही केली होती. तो या प्रकरणातून निर्दोष मुक्त झाला, की हे प्रकरण आजपावेतो न्यायप्रविष्ट आहे, याबाबत सविस्तर माहिती उपलब्ध होवू शकली नाही. मात्र सुधन्वा हा एका खून प्रकरणातील आरोपी असल्याचे सूत्रांकडून समजत आहे. सुधन्वा प्रथमपासून सनातन व शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान या संस्थांचा कट्टर कार्यकर्ता आहे. सुधन्वाच्या या कारनाम्यामुळे त्याच्या जवळच्या मित्रांना फार मोठा धक्का बसला आहे. त्याच्या हातून झालेला खून आम्ही समजू शकतो, मात्र देशविरोधी कारवायांमध्ये त्याचा सहभाग असेल, असे स्वप्नातही विचार केला नाही, अशी प्रतिक्रिया त्याच्या जवळच्या मित्रांनी सातारा टुडे शी बोलताना दिली.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |