01:51am | Dec 13, 2018 |
वरकुटे-मलवडी : महाराष्ट्राला दिशा देणारे दुरदर्शी नेतृत्व शरद पवार साहेबांच्या रुपात लाभलं हे आपलं भाग्य आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त दुष्काळग्रस्त गरजू व गुणवंत विद्यार्थ्यांची इयत्ता पाचवी व इयत्ता आठवीची शिष्यवृत्ती परीक्षेची फी भरणे व सरावसंच देण्याचा निर्णय आम्ही घेतला असे प्रतिपादन माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांनी केले.माण पंचायत समितीच्या बचत भवनात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
श्री देशमुख पुढे म्हणाले की, नेतृत्व, शिस्त, वेळेचे नियोजन, संवेदनशिलता, गरीब-गरजूंना मदत करण्याची वृत्ती असे विविध गुण शरद पवार यांच्याकडून घेण्यासारखे आहेत. यापुढील काळात देशाचं नेतृत्व करण्याची संधी शरद पवार यांना मिळावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना. माणमध्ये शिष्यवृत्तीतील यशाची उज्वल परंपरा आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे त्यात खंड पडायला नको म्हणून आम्ही हा उपक्रम घेतला. सध्याच्या बिकट परिस्थितीत सर्वांनी दुष्काळग्रस्तांच्या मागे खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन त्यांनी केले.
माण विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष डाॅ. संदीप पोळ म्हणाले की शरद पवार यांचे आयुष्य म्हणजे एक मार्गदर्शक पुस्तक आहे. त्यांनी माढा मतदारसंघाचे नेतृत्व केले ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त ड्रीम सोशल फाऊंडेशनने आयोजित केलेला उपक्रम स्तुत्य आहे.
जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष सुभाष नरळे म्हणाले की माणमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करुन सामाजिक बांधिलकी जपली आहे. शिक्षक करत असलेल्या प्रयत्नांना विद्यार्थ्यांची साथ मिळाल्यामुळे माणमधील मुले स्पर्धा परीक्षेत चमकत आहे. या सर्व प्रयत्नांना मदत मिळावी म्हणून दुष्काळी परिस्थितीत ड्रीम सोशल फाऊंडेशन तर्फे करण्यात आलेली मदत लाख मोलाची आहे.
सभापती रमेश पाटोळे यांनी या आगळ्यावेगळ्या उपक्रमाबद्दल प्रभाकर देशमुख व ड्रीम सोशल फाऊंडेशनचे माण पंचायत समितीच्या व शिक्षण विभागाच्यावतीने आभार मानले.
यावेळी 338 विद्यार्थ्यांची फी देण्यात आली व सर्व शाळांना सरावसंचांचे वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमास ड्रीम सोशल फाऊंडेशनच्या मार्गदर्शिका अनुराधा देशमुख, सिध्दनाथ पतसंस्थेचे चेअरमन सुनिल पोळ, बाजार समितीचे चेअरमन जाधव, माण राष्ट्रवादीचे अध्यक्ष बाळासाहेब सावंत, तानाजी मगर, रमेश शिंदे, बाळासाहेब शिंदे, विनय पोळ, नितीन सावंत, राजेंद्र खाडे, अमोल काटकर, सुरेंद्र मोरे,रमेश गायकवाड,बालाजी जगदाळे, प्रशांत विरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
सहाय्यक गट विकास अधिकारी भरत चौगले यांनी प्रास्ताविक केले. हणमंत जगदाळे यांनी सुत्रसंचालन केले तर रमेश शिंदे यांनी आभार मानले.
जिल्ह्यात 5105 पाणी स्त्रोतांची तपासणी |
आयुर्वेदिक गार्डनचा वॉकिंग ट्रॅक सुरू करण्याची मागणी |
तरुणांनी उद्योगविश्वात गरुड झेप घ्यावी |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एकास मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |
साताऱ्यात इयत्ता १२ वीच्या परीक्षेत मुलींची बाजी |
वडूज पंचायत समितीचा विस्तार अधिकारी लाच लुचपतच्या जाळ्यात |
खिडकीचे गज वाकवून लॅपटॉपची चोरी |
रामाचा गोट येथून युवक बेपत्ता |
विरळी येथे युवकाची आत्महत्या |