सातारा : सातार्यात उद्योजकाला व्यवसाय वृध्दीसाठी कर्जाची आवश्यकता असल्याने 125 कोटी रुपयांचे कर्ज देतो असे सांगून एकाने 80 लाख रुपये घेतले. कर्ज मिळेना व दिलेली रक्कमही परत मिळत नसल्याने अखेर त्या उद्योजकाने सातारा शहर पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांना माहिती दिल्यानंतर फसवणूकीचा आकडा ऐकून पोलिसही हडबडले. दरम्यान, बेंगलोर, वेळे (ता.वाई) व मुंबई येथील एकूण तिघांवर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
श्रीनिवास सत्यनारायण मधीनीधी (रा.बेंगलोर), अजित गायकवाड (रा.वेळे ता.वाई) व बिलाल मोमीन (रा. मुंबई) या तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी प्रसन्न आनंदराव देशमुख (रा.कामाठीपुरा, सातारा) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहेे. तक्रारदार प्रसन्न देशमुख यांची सातारा एमआयडीसी येथे युटोपिया एनर्जी नावाची कंपनी आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तक्रारदार प्रसन्न देशमुख हे 2015 मध्ये ते मुंबई येथे कामानिमित्त गेल्यानंतर त्यांची अजित गायकवाड याच्याशी ओळख झाली. ओळख झाल्यानंतर ते पुढेही संपर्कात राहिले. चर्चेदरम्यान तक्रारदार यांना कर्जाची आवश्यकता होती. ‘कंपनीसाठी कर्ज पाहिजे असल्यास आपण मला सांगा मी तुम्हाला कर्ज मिळवून देईन’, असे गायकवाड याने देशमुख यांना सांगितले. त्यासाठी देशुख यांना मुंबई येथे बोलावून घेतले व हॉटेल ओबेरॉय येथे श्रीनिवास मधीनीधी यांची कर्जासाठी ओळख करुन दिली.
मुंबईमध्ये तिघांची भेट झाल्यानंतर 125 कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देतो, असे सांगून श्रीनिवास मधीनीधी यांनी विश्वास संपादन केला. ई मेलद्वारे कागदपत्रे, फॉर्म पाठवून तो भरुन घेतला. कागदपत्रे पाहिल्यानंतर ते सातार्यातील कंपनी पाहण्यासाठी येतो, असे सांगितले. त्यानुसार कंपनी पाहिल्यानंतर परकीय गुंतवणूकदार मिळवून देतो, असे मधीमधी यांनी सांगितले. काही दिवस गेल्यानंतर परकीय गुंतवणूकदारप्रकरणी अमेरिकेची कंपनी तयार असल्याचे सांगितले. या माध्यमातून 125 कोटी रुपये मिळण्यास मदत होणार असल्याने प्रसन्न देशमुख यांनी त्याला होकार दिला.
सर्व प्रोसीजर झाल्यानंतर करारापोटी 80 लाख रुपये लागणार असल्याचे मधीनीधी यांनी देशमुख यांना सांगितले. ही प्रक्रिया वेळेत न केल्यास कर्ज व इतर फायदे मिळणार नसल्याचे त्यांनी सांगितले. पैशांची जुळवाजुळव करुन संबंधित 80 लाख रुपये तक्रारदार प्रसन्न देशमुख यांनी मिलाल मोमीन यांच्या हसीना एन्टरप्रायझेसच्या खात्यावर पैसे पाठवले होते.
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |