सातारा : नागेवाडी, ता. सातारा गावच्या हद्दीत खिंडीजवळ वाळू चोरी प्रकरणी पोलिस कारवाई करत असताना पसार झालेल्या दोघांना सव्वा वर्षानंतर अटक केली. वसंत महादेव बागडे (वय 42, रा. खर्शीबारामुरे ता. जावली) व अक्षय शंकर गायकवाड (रा. कळंबे ता. वाई) असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. संशयितांना एक डंपर, चारचाकी वाहनासह ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान सातारा पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण (डिबी) पथकाने ही कारवाई केली.
नागेवाडी हद्दीमध्ये खिंडीजवळ २६ सप्टेंबर २०१८ रोजी मंडलअधिकारी शिवाजी पिसाळ व इतर महसूलचे कर्मचारी अवैध वाळू वाहतुकीच्या कारवाईसाठी गेले होते. या पथकाला एक वाळूचा डंपर वाळू घेवून जात असताना दिसून आला. पथकाने या डंपर चालकाकडे चौकशी केली असता सदरची वाळू चोरीची असलेचे निदर्शनास आले. यावेळी सदर डंपरवर कारवाई करत असताना अज्ञात इसमांनी चारचारी कार आडवी मारून महसूल कर्मचार्यांना शिवीगाळ, दमदाटी करत डंपरमधील वाळू खाली करून तेथून डंपर सहित पळ काढला होता.
या सर्व थरारक घटनेमुळे महसूलचे कर्मचारी गांगरुन गेले होते. घटनेवेळी डंपर व चारचाकी कारचे नंबर नोंद करून अज्ञाताविरोधात तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांच्या तपासामध्ये वाहनांचे नंबर हे जुन्या मोटारसायकलचे असल्याचे तपासात उघड झाल्याने तसेच तपासकामी आवश्यक माहिती प्राप्त होत नसल्याचे संशयितांचा शोध घेणे पोलिसांना आव्हानात्मक बनले होते. अखेर पोलिसांना या घटनेचा छडा लावण्यात यश आले व दोघांच्या मुसक्या आवळल्या.
पोनि सजन हंकारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार दादा परिहार, सुजीत भोसले, निलेश जाधव, रमेश शिखरे, रमेश चव्हाण, संदीप कुंभार, उदयसिंग पावरा यांनी कारवाईत सहभाग घेतला.
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |

बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |