सातारा : इयत्ता पाचवीमध्ये शिकणार्या अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी (पोक्सो) जिल्हा व सत्र न्यायाधिश-5 पी.व्ही.घुले यांनी आरोपी अविनाश नवनाथ लकडे (वय 20, रा.पिंपरी ता.कोरेगाव) याला 10 वर्ष सक्तमजुरी व 10 हजार रुपये दंड तो न भरल्यास 1 वर्ष साधी कैदेची शिक्षा ठोठावण्यात आली. दरम्यान, दोन वर्षापूर्वी ही घटना घडलेली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, अविनाश लकडे हा पिडीत मुलीचे आई-वडीला कामाला गेल्यावर तो घरी जात होता. अल्पवयीन मुलगी त्यावेळी घरी एकटीच असायची. अवघ्या पाचवीमध्ये शिकत असणार्या या मुलीचा तो लैंगिक शोषण करत होता. अविनाश लकडे याने गैरकृत्य केल्याने मुलगी घाबरली होती. तो वारंवार हा प्रकार करु लागल्याने मुलीने घडलेल्या घटनेबाबतची माहिती आईला दिली. आईने घटना ऐकताच तत्काळ पतीला त्याबाबत सांगितले. अखेर 27 जून 2016 रोजी रहिमतपूर पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार देण्यात आली.
पोलिसांनी घटना ऐकल्यानंतर अविनाश लकडे याच्याविरुध्द पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करुन त्याला अटक केले. या प्रकरणाचा सपोनि व्ही.डी. ढगे व सपोनि श्रीगणेश कानुगडे यांनी तपास करुन जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
सरकार व बचाव पक्षाच्यावतीने जोरदार युक्तिवाद करण्यात आला. सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरुन न्यायाधिशांनी अविनाश लकडे याला शिक्षा ठोठावली. सरकार पक्षातर्फे अॅड. महेश कुलकर्णी यांनी युक्तिवाद केला. प्रॉसिक्युशन स्कॉडचे पोलिस हवालदार पी.के. कबुले, शमशुद्दीन शेख, अजित शिंदे, सुनील सावंत नंदा झांझुर्णे, कांचन बेंद्रे यांनी सहकार्य केले.
सातारा शहरातील तीन कॅफेंवर कारवाई; 9 जणांवर गुन्हे |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |

मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |