सातारा : स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाच्या पथकाने (एलसीबी) सातारा शहरातील वाढे फाटा येथे व मलटण ता.फलटण येथे दोन ठिकाणी कारवाई करुन दारु साठा जप्त केला. या कारवाईत कारसह तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. यामध्ये फलटणमधील संजीव बार रेस्टॉरंटच्या मॅनेजरचा समावेश आहे. दरम्यान, एलसीबीच्या कारवाईचा गेल्या तीन दिवसांपासून धडाका सुरु आहे.
दि. 13 रोजी वाढे फाटा येथे दारु वाहतूक सुरु असल्याची माहिती एलसीबीला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला असता एम एच 11 ए 7474 ही रिक्षा संशयास्पदरीत्या जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी रिक्षा थांबवून त्यामध्ये पाहणी केली असता देशी दारुचे बॉक्स आढळले. दारुची बेकायदेशीर वाहतूक होत असल्याने ती ताब्यात घेण्यात आली. याप्रकरणी रवी अंकुश सकटे, आदील खलील शेख (दोघे रा. आकाशवाणी केंद्राजवळ) यांना ताब्यात घेण्यात आले.
दरम्यान, फलटण येथे एलसीबीचे पथक गस्त घालत होते. यावेळी एम एच 02 केए 7142 ही कार पोलिसांच्या निदर्शनास आली. पोलिसांनी कार थांबवून पाहणी केली असता त्यामध्ये दारु होती. विकास संपत बाबर असे संशयिताने नाव सांगून तो संजीव बार रेस्टॉरंट, फलटणचा मॅनेजर असल्याचे सांगितले. पोलिसांनी दारु, कार असा एकूण 1 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलिस अधीक्षक धिरज पाटील, पोनि विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सागर वाघ, पोलिस हवालदार पृथ्वीराज घोरपडे, विलास नागे, ज्योतीराम बर्गे, विनोद गायकवाड, मोन नाचण, योगेश पोळ, राजकुमार ननावरे, नितीन भोसले, संतोष जाधव, प्रविण कडव, गणेश कापरे, वैभव सावंत, धिरज महाडीक, केतन शिंदे, मयुर देशमुख यांनी कारवाईत सहभाग घेतला.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |