01:03am | Mar 12, 2018 |
सातारा : सातारा नगरपालिकेच्या इमारतीखाली असलेल्या शॉपींग सेंटर मध्ये शनिवारी मध्यरात्री राजेंद्र बबन सुर्यवंशी (वय 45, रा. घोरपडे कॉलनी, केसकरपेठ सातारा) यांचा त्याचाच असलेला मित्र युवराज उर्फ बाबू रामचंद्र भोसले (वय 34, रा.केसरकर पेठ) याने डोक्यात तीक्ष्ण हत्याराने गंभीर वार करुन निर्घृण खुन केल्याचे समोर आले. पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले असतानाच स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाने अवघ्या 8 तासात मारेकर्याचा पर्दाफाश केला. दरम्यान, दारु कमी दिली व जुन्या वादाच्या संशयाच्या कारणातून हा खून झाला असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, रविवारी सकाळी सातारा नगरपालिकेच्या शॉपिंग मॉल सेंटरमध्ये एकजण मृतअवस्थेत पडला असल्याची माहिती समोर आली. या घटनेची चर्चा सातार्यात वार्यासारखी पसरल्यानंतर परिसरात बघ्यांची गर्दी उसळली. स्थानिक गुन्हे अन्वेषन, शहर पोलिस यांनीही घटनास्थळी तत्काळ धाव घेतली. पोलिसांनी परिसरात पाहणी केली असता मृतदेह अंथरूणावर होता व अज्ञाताचा धारदार शस्त्राने खून झाला असल्याचे स्पष्ट झाले. तसेच मृतदेहाच्या शेजारी दारूच्या बाटल्या आणि जेवणाच्या पिशव्या अस्ताव्यस्त पडलेल्या दिसत होत्या. याचवेळी सुर्यवंशी कुटुंबिय घटनास्थळी आल्यानंतर तो मृतदेह राजेंद्र सुर्यवंशी यांचा असल्याचे स्पष्ट झाले.
घटनास्थळाचा पंचनामा झाल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला. दरम्यानच्या काळात खूनाचे कारण? राजेंद्र सुर्यवंशी तेथे का झोपत होते? खून कशाने झाला? खूनी कोण? नेमकी घटना किती वाजता घडली? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी घटनास्थळी श्वानपथक आणि ठसे तज्ञांना पाचारण केले. श्वान पथकाने मृतदेहापासून ते रस्त्यापर्यंत माग काढला मात्र पुढे ते तेथेच घुटमळले.
राजेंद्र सुर्यवंशी याचा भाऊ शेखर सुर्यवंशी याने पत्रकारांना माहिती देताना सांगितले की, त्याची पत्नी त्याला सोडून पाच ते सहा वर्षापासून माहेरी मुलांसह रहात असते. राजेंद्र हा पेंटरचे काम करतो. गेले 5 ते 6 वर्षापासून तो रात्री घरी न झोपता नगर पालिकेच्या इमारतीखाली नव्याने गाळे काढले आहेत तेथेच झोपतो. शनविारी रात्री नेहमीप्रमाणे तो जेवण करुन झोपायला गेला असल्याचे मृताचे भाउ शेखर सुर्यवंशी यांनी सांगितले.
पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून एलसीबीच्या पोलिसांनी तत्काळ तपासासाठी पथके रवाना केली. सकाळी खूनाची घटना सकाळी समोर आल्यानंतर दिवसभर त्याबाबत सातार्यात चर्चा सुरु होती. दिवसभर खूनाचे गूढ असतानाच एलसीबीला अवघ्या ८ तासात खूनाचा छडा लावण्यात यश आले. संशयित बाबू भोसले व मृत राजेंद्र सुर्यवंशी हे मित्र होते. शनिवारी रात्री नेहमीप्रमाणे ते दोघे झोपण्याच्या ठिकाणी आले. झोपण्यापूर्वी आणलेल्या दारुवरुन त्यांचा वाद झाला. संशयिताला दारु कमी मिळाल्याने वादाचे पर्यवसन हाणामारीत व त्यानंतर संशयिताने धारदार शस्त्राने वार केला व खूनाच्या घटनेनंतर तो पसार झाला. अखेर सांयकाळी संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याने खूनाची कबुली दिली.पोलिस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक विजय पवार, पोलिस उपअधीक्षक डॉ.खंडेराव धरणे, पोनि पद्माकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विकास जाधव, फौजदार प्रसन्न जर्हाड, पोलिस हवालदार सुरेंद्र पानसांडे, मोहन घोरपडे, उत्तम दबडे, मुबीन मुलाणी, नितीन गोगावले, प्रवीण फडतरे, विजय सावंत यांनी कारवाईत सहभाग घेतला.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |