02:15am | Apr 11, 2019 |
कराड : धावरवाडी (ता. कराड) येथील जयवंत शुगर्स लिमिटेडच्या आठव्या गळीत हंगामाची उत्साहात सांगता झाली. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात कारखान्याचे संस्थापक तथा य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले आणि श्री. विनायक भोसले यांच्या हस्ते ऊसतोडणी वाहतूकदारांचा सत्कार करण्यात आला.
सातारा जिल्ह्यात सर्वाधिक साखर उतारा असणारा कारखाना म्हणून लौकिक मिळविणार्या जयवंत शुगर्सने एकूण 160 दिवसांच्या हंगामात 6 लाख 41 हजार 979 मेट्रीक टन ऊस गाळप केले असून, 8 लाख 35 हजार 600 क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. तर सरासरी साखर उतारा 13.02 टक्के इतका उच्च राहिलेला आहे. याचबरोबर गुणवत्ता आणि ध्येय्यपूर्तीचा अपूर्व संगम असलेला जयवंत शुगर्सचा डिस्टलरी प्रकल्प पूर्णत्वास गेला असून, सध्या 45 हजार लिटर प्रतिदिन क्षमतेने हा प्रकल्प सुरू आहे. 70 टक्के स्पेंटवॉश आणि 30 टक्के इंधनद्वारे चालविला जाणारा अत्याधुनिक बॉयलर या प्रकल्पात कार्यन्वित करण्यात आला असून; इथेनॉल, ईएनए, तसेच रेक्टिफाईड स्पिरीटची उत्कृष्ट दर्जाची निर्मितीही या प्रकल्पाद्वारे केली जाते. शिवाय 100 टक्के झिरो लिक्विड डिसार्जमुळे हा प्रकल्प पूर्णपणे प्रदूषणविरहीत बनला आहे.
हंगाम सांगता सोहळ्याच्या निमित्ताने कारखाना कार्यस्थळावर आयोजित कार्यक्रमात सर्वाधिक ऊसवाहतूक करणार्या तोडणी वाहतूकदारांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये भगवान पवार, कृष्णा काशीद, परशुराम काशीद, मुरलीधर काशीद, परशुराम झुंबड, गणेश देवगुडे, सोमीनाथ यादव, सुंदर पवळ या तोडणी वाहतूकदारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जयवंत शुगर्सचे चेअरमन चंद्रकांत देसाई, प्रेसिडेंट सी. एन. देशपांडे, कृष्णा अभिमत विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव एस. ए. माशाळकर, सुरक्षा अधिकारी व्ही. वाय. चव्हाण, जयवंत शुगर्सचे सरव्यवस्थापक एन. एम. बंडगर, वर्क्स मॅनेजर आर. आर. इजाते, प्रशासकीय अधिकारी ए. आर. पाटोळे, चिफ केमिस्ट जी. व्ही. हराळे, कामगार अधिकारी संजय भुसनर, सिव्हिल इंजिनिअर शब्बीरहुसेन शेख, शेती अधिकारी एन. जे. कदम, चिफ फायनान्स अधिकारी आर. एस. चन्ने, डिस्टलरी मॅनेजर सुरेंद्र भिंताडे, केनयार्ड सुपरवायझर ए. एम. गोरे, एस. एम. सोमदे, सहाय्यक सुरक्षा अधिकारी जालिंदर यादव यांच्यासह कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी आणि ऊसउत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |