02:25pm | Aug 02, 2018 |
सातारा : जसा सूर्य समुद्र आणि नदीतील पाणी बाष्पीभवनाच्या माध्यमातून घेवून पाण्याचे ढगात रुपांतर करतो आणि ते ढग सर्व समान पावसाच्या रुपात पडतात तसेच काम मसहूल प्रशासनाला करावे लागते. महसूल प्रशासनाकडून शेवटच्या माणसापर्यंत पोहचणे आणि त्याला समान न्याय देण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न असतो, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी आज केले.
1 ऑगस्ट हा महसूल दिन आज कोरेगाव येथील साई मंगल कार्यालयात साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल बोलत होत्या. या कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी सचिन बारवकर, प्रांताधिकारी स्वाती देशमुख, अस्मिता मोरे, हिंम्मत खराडे, संतोष जाधव, कीर्ति नलावडे, श्रीरंग तांबे, दादासाहेब कांबळे यांच्यासह सर्व तहसीलदार उपस्थित होते.
यावर्षी सातारा जिल्ह्याने गौण खनिज व इतर बाबींमध्ये मोठ्या प्रमाणात महसूल विभागाने महसूल जमा केला आहे, ही कौतुकाची बाब आहे. यामध्ये महसूल विभागातील खालच्या स्तरातील कर्मचाऱ्यांपासून ते अधिकाऱ्यांचे या यशात सहभाग आहे. महसूल कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या विघातक शक्तींवर कायद्याच्या कक्षेत कडक शिक्षा होईल पुन्हा अशा विघातक शक्ती महसूली कामात अडथळा निर्माण करणार नाहीत. महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रमाणिकपणे कामे करावी मी तुमच्या पाठीशी आहे. कोणी कामात अडथळा निर्माण करत असल्यास त्यांच्या आपण अधिकाधिक कडक शिक्षा करण्यासाठी मागे पुढे पाहणार नाही, असा इशाराही जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी यावेळी दिला.
महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचाही सत्कारही जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमास महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशासकीय कामात तणावमुक्त राहून काम कसे करावे याबाबत यशदाचे प्रा. अशोक देशमुख यांनी मार्गदर्शन केले.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |