सातारा : येथील विश्वकर्मा पंचाल सुवर्णकार समाज संस्थेचा रौप्य महोत्सवी वर्धापनदिन समारंभ शनिवार, दि. 26 रोजी शुक्रवार पेठेतील शिवम हॉल येथे विविध मान्यवरांच्या उपस्थित होणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष सागर सागवेकर व उपाध्यक्ष गणेश धावडसकर यांनी दिली.
गेल्या 25 वर्षांपासून सुवर्णकाम समाजातील बांधवांसाठी कार्यरत असलेली ही संस्था रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. यावर्षी यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 9 वाजता चित्रकला व रांगोळी स्पर्धा, 10 वाजता मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व संत नरहरी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन होणार आहे. यानंतर मान्यवरांकडून मार्गदर्शनानंतर दुपारी वधुवर परिचय मेळावा, स्नेहभोजन, सांस्कृतिक कार्यक्रम, ज्येष्ठांचा सत्कार, गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा होणार आहे.
या कार्यक्रमास विश्वकर्मा सुवर्णकार महासंघाचे अध्यक्ष मुरलीधर बोरसुतकर, रत्नागिरी विश्वकर्मा सुवर्णकार संस्थेचे अध्यक्ष संजय देवरुखकर, विश्वकर्मा सुवर्ण समाज मुंबईचे अध्यक्ष सुरेश पोतदार, सांगली विश्वकर्मा समाज संस्थेचे अध्यक्ष प्रकाश सडकर, पुण्याच्या संस्थेचे कार्याध्यक्ष गणेश पाचेरकर, पुण्याच्या नरहरी महाराज ग्रुपचे अध्यक्ष अजय पालकर, बोरिवली मुंबईचे अध्यक्ष महेंद्र वारणकर तर सांताक्रूझ सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष सुधीर सागवेकर तसेच गंगाधर बसणकर, सौ. नीता नगरकर व प्रदीप पोतदार या मान्यवरांची उपस्थिती या सोहळय़ास लाभणार आहे. यावेळी सुवर्णकार समाजातील बांधवांना व्यवसायात येणाऱया अडीअडचणी तसेच विविध प्रश्नांबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
समारंभ यशस्वी करण्यासाठी विश्वकर्मा पंचाल सुवर्णकार समाज संस्थेचे सचिव किशोर पोतदार, खजिनदार प्रीतम पोतदार, कार्यकारिणी सदस्य नारायण देवरुखकर, सोमनाथ पोतदार, मुकेश पोतदार, रत्नदीप करंजवकर, रोहित धावडसकर, अक्षय देवरुखकर परिश्रम घेत आहेत. जिल्हाभरातील पंचाल सुवर्णकारांनी यावेळी उपस्थित रहावे, असे आवाहन अध्यक्ष सागर सागवेकर यांनी केले आहे.
सातारा शहरातील तीन कॅफेंवर कारवाई; 9 जणांवर गुन्हे |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |

मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |