सातारा : सोमवारी सकाळी संतोष जयसिंग शिंदे (वय 38, रा.शिवाजीनगर, शाहूपुरी) यांनी डोक्यात बंदूकीतून स्वत:वर गोळी झाडून सुसाईड केल्यानंतर रात्री उशीरा गुन्हे दाखल झाले. संतोष शिंदे यांच्या पत्नी यांनी दीर गणपत जयसिंग शिंदे व जाऊ वर्षा शिंदे (रा.शिवाजीनगर) यांच्याविरुध्द प्रॉपर्टीच्या कारणातून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणाची तक्रार दिली आहे. दरम्यान, स्वत: पोलिसांनी बेकायदा शस्त्र बाळगून आत्महत्या केल्याचा संतोष शिंदे यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, सोमवारी सकाळी संतोष शिंदे अकरा वाजण्याच्या सुमारास राहते घरासमोर बंदूकीतून स्वत: च्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेमुळे सातार्यात खळबळ उडाली होती. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. याप्रकरणी रात्री उशीरा मृत संतोष शिंदे यांच्या पत्नी कल्याणी शिंदे यांनी दीर गणपत शिंदे यांच्याविरुध्द तक्रार दिली. या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, गेल्या 12 वर्षापासून पती संतोष व दीर गणपत यांच्यामध्ये प्रॉपर्टीवरुन वाद सुरु आहेत. वेळोवेळी गणपत शिंदे यांच्याकडून पतीला शिवीगाळ, दमदाटी करुन तू मेलेला बरा, अशी हेटाळणी होत होती. सोमवारी सकाळी याच कारणातून वाद झाला व त्यातून पतीने आत्महत्या केली. या घटनेला जाऊ वर्षा शिंदेही जबाबदार असल्याने त्या दोघांविरुध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान, सोमवारी रात्री पोलिसांनी तपास केल्यानंतर ज्या बंदूकीतून संतोष शिंदे यांनी आत्महत्या केली ते बेकायदेशीर असल्याचे समोर आले आहे. त्यावरुन पोलिस हवालदार मोहन पवार यांनी मृत संतोष शिंदे यांच्याविरुध्द आर्म क्टचा गुन्हा दाखल केला आहे. सोमवारी झालेल्या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण कायम होते. याठिकाणी वास्तव्य करणारे गणपत शिंदे यांच्या घराला कुलुप होते. शाहूपुरी पोलिस पुढील तपास करत आहेत.
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |