सातारा : ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरच्या वतीने १२०० महिलांपैकी स्तनाच्या कर्करोगासाठी ६४३ महिलांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ८२१ महिलांना गर्भाशयाच्या कर्करोगासाठी तपासण्यात आले. त्यापैकी ८९ महिलांमध्ये संशयास्पद शारीरिक बदल दिसून आल्याने त्यांना पुढील तपासण्या करण्याची आवश्यकता असल्याचे संरक्षणात नमूद करण्यात आले आहे, अशी माहिती कॅन्सर तज्ञ डॉक्टर करण चंचलानी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते पुढे म्हणाले, कर्करोग झालेल्या रुग्णाचे वेळीच निदान झाले व योग्य उपचार झाले तर तो रुग्ण देखील चांगले आयुष्य जगू शकतो. अनेकदा कर्करोग हा शब्द ऐकूनच रुग्ण खचून जातो, मात्र आज आपल्या आजूबाजूला अशी अनेक उदाहरणे आहेत की त्यांनी कर्करोगावर मात करून आपले दैनंदिन जीवन जगत आहेत. आजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी वेळोवेळी आरोग्य तपासणी करून घेणे आवश्यक आहे. स्तनाचा अथवा गर्भाशयाचा कर्करोग होऊ नये यासाठी प्रत्येक महिलेने आपल्या शरीरातील बदल वेळीच ओळखणे गरजेचे आहे.
जुवियस लाईफ सायन्सेस यांच्या सहयोगाने सातारा जिल्ह्यातील १२०० महिलांसाठी स्तनाचा व गर्भाशयाचा कर्करोग तसेच संपूर्ण शरीर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यापैकी जवळपास १० टक्के महिलांना कर्करोग असण्याची शक्यता प्राथमिक क्षणी समोर आली आहे. नागरिकांमध्ये कर्करोगाविषयी शासकीय योजना आणि विविध कार्यक्रमाद्वारे जनजागृती करण्यासाठी प्रयत्न सुरू असून आतापर्यंत २ हजार नागरिकांपर्यंत विविध माध्यमातून पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. २०१८-१९ मध्ये एकूण ५३ लोकांचा कर्करोग शोधून त्याच्यावर उपचार केले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. पत्रकार परिषदेला प्रताप राजेमहाडिक, सचिन देशमुख उपस्थित होते.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |