सातारा : गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या पासपोर्ट कार्यालयाचा शुभारंभ दि.14 मे रोजी झाल्यानंतर एका आठवड्यात तीनशे अर्ज दाखल झाले आहेत. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून प्रत्येक दिवसाला सरासरी तीस अर्ज दाखल होत असून अर्जदारांनी निवडलेल्या वेळेप्रमाणे मुळ कागदपत्रांची व बायोमेट्रीक प्रणालीव्दारे अर्जदाराची सत्यता पडताळली जात आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील पोस्ट ऑफीस कार्यालयात पासपोर्ट कार्यालय सुरू झाले आहे. पासपोर्ट व पोस्ट ऑफीस कार्यालयाचे प्रत्येकी दोन असे एकूण चार अधिकाऱ्यांची नियुक्ती कार्यालयात करण्यात आली आहे. साताऱ्यात कार्यालयात सुरू झाल्यामुळे जिल्हावासियांना आता पुण्याला जाण्याची पायपीट थांबण्यास मदत होत आहे. पासपोर्ट काढण्यासाठी अर्जदाराने प्रथम पासपोर्ट कार्यालयाच्या वेबसाईटवर ऑनलाईन पध्दतीने फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरताना कागदपत्रे व अर्जदाची सत्यता पडताळणीसाठी पासपोर्ट कार्यालयात येण्याची तारीख त्याच वेळी निवडायची आहे. निवडलेल्या तारखेदिवशी मुळ कागदपत्रे घेवून कार्यालयात आल्यानंतर त्या ठीकाणी अर्जदाराची पडताळणी प्रक्रिया पुर्ण केली जात आहे. सध्या पडताळणी करण्यासाठी जिल्ह्यातून दररोज सरासरी तीस अर्जदार कार्यालयात येत आहेत. पडताळणी झाल्यानंतर रिपोर्ट पुणे येथील क्षेत्रीय पासपोर्ट कार्यालयाला पाठविला जातो. त्यानंतर क्षेत्रीय कार्यालयातून अर्जदाराची चारित्र्य पडताळणी करण्यासाठी अर्जदारा रहिवास करित असलेल्या हद्दीतील पोलीस ठाण्यास पत्र पाठविले जाते. त्यानंतर पोलीस अर्जदारावर गुन्हे दाखल आहेत का, त्याबाबतची पडताळणी करतात व त्या प्रक्रियेनंतर अर्जदाराला पोलीस ठाण्यात दोन ओळखीचे लोक घेवून जावे लागते अथवा पोलीस ही अर्जदाराच्या घरी येवून पुर्ण पडताळणी करतात. पडताळणी पुर्ण झाल्यानंतर पोलीस रिपोर्ट पुणे येथील क्षेत्रीय पासपोर्ट कार्यालयाला पाठवितात व त्यानंतर अर्जदाराला पासपोर्ट पोस्टाव्दारे पाठविण्यात येतो.
पासपोर्टसाठी दिड महिन्याचा कालावधी
पासपोर्टसाठी अर्ज पाठविण्यापासून ते सर्व प्रकिया पुर्ण होवून पासपोर्ट मिळण्यासाठी सध्या किमान दिड महिन्याचा कालावधी लागत आहे. या प्रक्रियेसाठी अर्ज भरताना दिड हजार रूपये इतके शुल्क ऑनलाईन अथवा चलनस्वरूपात भरणे आवश्यक आहे. तर तात्काळ पासपोर्ट प्राप्त करण्यासाठी साडेतीन हजार रूपये शुल्क भरल्यास अधिक गतीने पासपोर्ट प्राप्त होतो.
बारामतीप्रमाणे पाटणमध्ये कार्यालयाची गरज
पासपोर्ट कार्यालयाने नुकतेच पुणे जिल्ह्यात बारामती तर सोलापुर जिल्ह्यात माढा येथे अतिरिक्त कार्यालयांना मंजुरी दिली आहे. त्या धर्तीवर सातारा जिल्ह्यातील दुर्गम तालुक्यांमध्ये महाबळेश्वर, पाटण व दहिवडी येथे पासपोर्ट कार्यालय सुरू करण्याची मागणी आता पुढे येवू लागली आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |