कराड : मलकापूर नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी बुधवारी प्रभाग रचनेसह आरक्षण जाहिर झाले. आरक्षणात महिला वर्गाला जास्त संधी असून राजकीय कार्यकर्त्यांसाठी कही खुशी कही गम असे वातावरण दिसते. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर आजच्या आरक्षणाकडे अनेकांचे लक्ष लागले होते. आरक्षणात अनेकांचे प्रभाग खुले झाल्याने त्यांचे चेहरे खुलल्याचे दिसत होते.
मलकापूर नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी लक्ष्मीदेवी मंदीरासमोरील सभागृहात सकाळी 11 वाजता आरक्षण सोडतीला सुरूवात झाली. निवडणुक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी हिंमत खराडे यांनी आरक्षण सोडतीची प्रशासकीय प्रक्रिया सुरूवातीला समजावून सांगितली. चिठ्ठीपद्धतीने आरक्षण काढण्यात आले. यावेळी सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी संजीवनी दळवी यांची प्रमुख उपस्थिती होती. आरक्षण काय पडते हे पाहण्यासाठी सर्वच राजकीय गटातील कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. प्रभाग क्रमांक 1 मध्ये संगम हॉटेल परिसर, कालिदास मार्केट, नेहरूनगर, रिमांड होम परिसर, चांदे वस्ती, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शास्त्रीनगर परिसर, वीज लाईन, नेताजी सुभाषचंद्रनगर, वारणा हॉटेल परिसर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, दत्तनगर परिसर, साईनगर, विशाल कॉलनी, संभाजी कॉलनी हा परिसर येतो. सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण असे आरक्षण या प्रभागात पडले आहे.
प्रभाग क्रमांक 2 मध्ये अजंठा पोल्ट्री फार्म परिसर, मळाईनगर, यशवंतनगर, प्रितीसंगम मंगल कार्यालय परिसर, मुल्ला वस्ती, गोकाक ऑफिस परिसर, तुळजाईनगर, हॉटेल नवरंग परिसर, अक्षदा मंगल कार्यालय परिसर, हॉटेल राजतारा परिसर, लक्ष्मी कॉलनी, सरस्वती कॉलनी, ज्ञानदिप कॉलनी हा परिसर येतो. या प्रभागात नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आणि सर्वसाधारण असे आरक्षण पडले आहे.
प्रभाग क्रमांक 3 मध्ये तवटे मार्केट परिसर, डी. एम. एस. कॉम्प्लेक्स परिसर, म्हसोबा मंदिर परिसर, गणेश मंगल कार्यालय परिसर, कुसूम रेसिडेन्सी परिसर, विश्रामनगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परिसर, अहिल्यानगर अंतर्गत रस्त्याच्या उत्तरेकडील भाग, बिरोबा मंदिराचे पुर्वेकडील भाग, गजानन पतसंस्था परिसर, भारती विद्यापीठ परिसर, यशवंत हौसिंग सोसायटी व परिसर, श्री. गोफणे यांचे घरापर्यंतचा दक्षिण भाग, आनंदराव चव्हाण हायस्कूल हा परिसर येतो. नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण महिला असे आरक्षण पडले आहे.
प्रभाग क्र. 4 मध्ये भोजगावकर कॉम्प्लेक्स परिसर, मळाई टॉवर, सोनाई मंगल कार्यालय परिसर, हौसाई कन्याशाळा परिसर, कराड खरेदी विक्री संघ पेट्रोल पंप परिसर, नटराज थेटर परिसर, लाहोटीनगर, इंदूमतीनगर, शिवाई पतसंस्था परिसर, कोणार्क पार्क, संगम कॉलनी, मामा बझारचे उत्तरेकडील परिसर, दत्त मंदीराचे पूर्वेकडून गेलेल्या रस्त्याच्या पूर्वेकडील भाग हा भाग आहे. या प्रभागात सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण आरक्षण पडले आहे.
प्रभाग क्रमांक 5 मध्ये दत्त मंदिर परिसर, संपूर्ण बागल वस्ती परिसर, दत्त - शिवम हौसिंग सोसायटी, जय मल्हार कॉलनी, न्यु सर्वोदय सोसायटी व त्याचा भाग, अयोध्यानगरी, नूतन मराठी प्राथमिक शाळा परिसर, शिवदर्शन हौसिंग सोसायटी, बालाजी कॉलनी पूर्व भाग हा परिसर आहे.या प्रभागात अनुसुचित जाती खुला आणि सर्वसाधारण महिला असे आरक्षण पडले आहे.
प्रभाग क्रमांक 6 मध्ये बालाजी कॉलनी पश्चिम भाग, जाधव वस्ती, पोळ वस्ती, वाघमारे वस्ती, पवार वस्ती, गणेश मंदिर परिसर, रैनाक वस्ती, इंगवले वस्ती, जाधव वस्ती, गणेश कॉलनी व पूर्वेकडील संपूर्ण भाग, शिवपार्वती कॉलनी, अभिनव कॉलनी, तडक वस्ती, त्रिमूर्ती कॉलनी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आगाशिवनगर नं. 2 परिसर, हनुमाननगर परिसर, महसूल कॉनल हा परिसर आहे.या प्रभागात नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण महिला असे आरक्षण पडले आहे.
प्रभाग क्रमांक 7 मध्ये प्राथमिक आरोग्य उपकेंदाचे पश्चिमेकडील झोपडपट्टी व परिसर, दांगटवस्ती, कोल्हाटी वस्ती, मलकापूर नगरपरिषद जलशुद्धीकरण केंद्र व त्याचे दक्षिणेकडील झोपडपट्टी आझाद कॉलनी, जिल्हा परिषद हौसिंग सोसायटी, लोकमान्य कॉलनी, ढेबेवाडी रस्त्याचे लगतच भाग (माने वखारीपासून उत्तरेकडे गेलेल्या रस्त्यापर्यत), सर्वोदय बकवर्ड क्लास हौसिंग सोसायटी हा परिसर आहे. या प्रभागात अनुसूचित जाती महिला आणि सर्वसाधारण खुल्या गटासाठी आरक्षण पडले आहे.
प्रभाग क्रमांक 8 मध्ये इंद्रप्रस्थ कॉलनी मधील रस्ता क्र. 2 चे दक्षिणेकडील डोंगरापर्यतचा भाग, माने वखारीपासून दक्षिणेकडे गेलेल्या रस्त्याचे पूर्वेकडील भाग, वृंदावन कॉलनी, धर्मवीर संभाजीराजे कॉलनी, कृष्णा हॉस्पिटल परिसर, विठ्ठलदेव हौसिंग सोसायटी, कोयना औद्योगिक वसाहत, शिवदर्शन हौसिंग सोसायटी परिसर, व्यंकटेशनगर, खंडोबानगर, साई शिक्षक कॉलनी, थोरात मळा हा परिसर आहे. नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, सर्वसाधारण असे आरक्षणे पडली आहेत.
प्रभाग क्रमांक 9 मध्ये लक्ष्मीनगर (गावठाण ) संपूर्ण परिसर, अनुराज अपार्टमेंट व परिसर, अनुराज अपार्टमेंट व परिसर, अहिल्यानगर अंतर्गत रस्त्याचे दक्षिणेकडील व मुख्य रस्त्यालगतचा भाग, औदुंबर कॉलनी, हिंगसे किराणा स्टोअर्स परिसर, डॉ. बने यांचे घरालगतचा परिसर, शिवाजीनगर मुख्य रस्त्याचे पूवेकडील व पश्चिमेकडील संपूर्ण भाग, जगदाळे मळा व परिसर स्मशानभूमी परिसर, रिलायन्स पेट्रोल पंप परिसर, बोरगे मळा, शिंदे मळा, बागल मळा, खरवत ओढा ते मळाईदेवी पतसंस्था पर्यंतचा भाग हा परिसर आहे. या प्रभागात नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण असे आरक्षण पडले आहे.
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |