06:37pm | Mar 26, 2019 |
सातारा : लोकसभा निवडणुकांचा जसजसा फिव्हर वाढत चालला आहे, तसतशी सातारा लोकसभेच्या प्रचाराला धार येवू लागली आहे. गेल्या आठवड्यापासून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार उदयनराजे यांनी महाविद्यालये व शैक्षणिक संकुलांमध्ये तरुणाईच्या भेटी गाठींचा धडाका लावला आहे. आजही खा. उदयनराजेंनी सातार्यातील विधी महाविद्यालयास भेट देवून प्रशिक्षणार्थी विधीज्ञांशी संवाद साधत आपल्या हटक्या स्टाईलने त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. एकूणच उदयनराजेंच्या या अल्हाददायक सर्जिकल स्ट्राईकने प्रशिक्षणार्थी विधीज्ञही भारावून गेल्याचे चित्र येथील विधी महाविद्यालयात निर्माण झाले.
युतीकडून युतीच्या उमेदवाराची आजपासून मतदारांच्या जनसंपर्काला चाचपडत सुरुवात झाली असली तरी सातारा लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार उदयनराजेंनी मात्र भर उन्हाळ्यात लोकांच्या जनसंपर्काचा धडाका लावला आहे. पायाला भिंगरी बांधून गेल्या आठवड्यापासून खा. उदयनराजे प्रचारासाठी फिरत आहेत. यंदा उदयनराजेंनी तरुणवर्गाला आपला प्रचाराचा केंद्रबिंदू मानून आपली रणनीती आखली आहे. खा. उदयनराजेंच्या स्टाईलची स्थानिक ते देशपातळीवरील माध्यमे दखल घेत असतात. अनेकदा उदयनराजेंना फक्त टीव्ही वाहिन्यांवरच अनेकांनी पाहिलेले असते. त्यामुळे साहजिकच उदयनराजेंना प्रत्यक्ष पाहण्याची संधी कोणताही तरुण दवडत नाही. सातारा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उदयनराजेंनी महाविद्यालये व शैक्षणिक संकुलांमध्ये भेटीचा धडाका लावल्यामुळे तरुणाईला उदयनराजेंना याची देही याची डोळा पाहण्याची संधी मिळाल्यामुळे त्यांच्यामध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
आज दि. 26 रोजी खा. उदयनराजे यांनी सातारा येथील इस्माईलसाहेब मुल्ला विधी महाविद्यालयास भेट दिली. यावेळी अनेक प्रशिक्षणार्थी विधीज्ञांनी उदयनराजेंना प्रश्न विचारले. उदयनराजेंनीही आपल्या हटके स्टाईलने त्यांच्या प्रश्नास उत्तरे दिली. उदयनराजेंच्या या ‘आप की अदालत’मध्ये उदयनराजेंना ‘एक बार मैने कमिटमेंट कर दी, तो मै अपने आप की भी नहीं सुनता’ असा डायलॉग मारुन उदयनराजे कॉलर उडवायलाही विसरले नाहीत. त्यामुळे आज सातार्यातील विधी महाविद्यालयात रंगलेल्या उदयनराजेंच्या अदालतीची चर्चा जास्त होती.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |