02:58pm | May 19, 2019 |
म्हसवड : माण तालुका पंचायत समितीचे माजी सभापती वसंतराव जगताप तथा पिंटूदादा यांच्या पार्थिवावर शनिवारी सायंकाळी त्यांच्या वरकुटे-मलवडी गावी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी संपूर्ण माण तालुक्यातील पिंटूदादांचे कार्यकर्ते, मान्यवरांची अंत्यदर्शनासाठी हजारोंच्या संख्येने आपल्या नेत्याला निरोप देण्यासाठी गर्दी झाली होती.
स्वीत्झर्लंड येथे सोमवारी सायंकाळी हृदयविकाराच्या धक्क्याने रुग्णालयात उपचार घेत असताना पिंटूदादा यांची प्राणज्योत मालवली. परदेशी कायद्याचे सोपस्कर पूर्ण करून शनिवारी सकाळी त्यांचे पार्थिव मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणण्यात आले होते. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास मुंबईहून पार्थिव माण तालुक्यातील वरकुटे-मलवडी येथे त्यांच्या मूळ गावी आणले. त्यांचे पार्थिव वरकुटे-मलवडी येथे आणल्याची माहिती मिळताच हजारो चाहत्यांनी त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती.
यावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन पुष्पांजली अर्पण केली. यावेळी पशुसंवर्धन मंत्री नामदार महादेव जानकर, माण तालुक्याचे आ. जयकुमार गोरे, माजी आमदार दिलीप येळगावकर, माजी आमदार प्रभाकर घार्गे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, माणचे विद्यमान सभापती रमेश पाटोळे, माजी शिक्षण सभापती भास्करराव गुंडगे, माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, पंचायत समिती सदस्य तानाजी काटकर, मनोज पोळ, हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार, माण तालुक्यातील विविध पक्षांच्या पदाधिकार्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अंत्यदर्शन घेऊन अंत्ययात्रेत सहभाग घेतला.
सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास जगताप यांच्या निवासस्थानापासून अंत्ययात्रा काढण्यात आली. फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टरमधून पार्थिव स्मशानभूमीत आणले. त्या ठिकाणी त्यांचा मुलगा उदय यांनी भडाग्नी दिला. सोमवारी सकाळी रक्षाविसर्जनाचा विधी वरकुटे-मलवडी, ता. माण येथे होणार आहे.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |