12:29am | Mar 11, 2019 |
म्हसवड : वरुणराजाचे वरदान न लाभलेल्या साताऱ्यातील काही दुष्काळी भागापैकीच माण-म्हसवड हा भाग. परंतु, निसर्गापुढे हतबल न होता आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने व सुबद्ध नियोजनातून याभागातही पिकाची उत्पादकता वाढू शकते हा विश्वास ‘लीन ऍग्री’ ने येथील बळीराजास दिला. हा विश्वास आता मूर्त रुपात साकारला गेला असून उत्पादकता वाढलेले शेतकरी अनौपचारिक संवादातून आपली यशोगाथा सर्वांसमोर उलगडणार आहेत.
यासाठी ‘लीन ऍग्री’तर्फे सोमवार दि. ११ मार्च रोजी दुपारी ३ वाजता म्हसवड पुळकोटी रस्त्यावरील मेगा सिटी येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आहे. यावेळी टी आय एस एस चे श्री एम व्ही अशोक, नाबार्ड चे अधिकारी, माण तालुक्याचे तहसीलदार श्री माने, माणदेशी महिला सहकारी बँकेच्या संस्थापक चेतना सिन्हा आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती ‘लीन ऍग्री’च्या संचालिका सई गोळे आणि संचालक सिद्धार्थ यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
माणदेशी संस्थेच्या सहकार्याने व ‘लीन ऍग्री’ च्या मार्गदर्शनातून म्हसवड तालुक्यातील १००हून अधिक शेतकऱ्यांनी यंदाच्या वर्षी शेतीची लागवड केली. यापैकी बहुतांशी शेतकऱ्यांनी कांद्याचे उत्पादन घेतले होते. ‘लीन ऍग्री’ प्रणालीच्या परिणामकारक वापरानंतर
मागील वर्षाच्या तुलनेत शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात ३० ते ४० टक्क्यांनी घट झाली. तसेच उत्पादनाचा दर्जाही सुधारला. सर्व खर्च वजा जाऊन मिळणाऱ्या उत्पन्नात ३० ते ४० टक्के वाढ झाल्याचेही त्यांना जाणवले. यांची यशस्वी गाथा सर्वांपर्यंत पोहोचावी आणि आपल्या इतर शेतकरी बांधवांना ही याचा फायदा व्हावा, या उद्देशाने यशस्वी झालेल्या शेतकऱ्यांपैकी प्रातिनिधिक पाच शेतकरी या मेळाव्यातून उपस्थितांशी संवाद साधणार आहेत. असेही या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
जिल्ह्यात 5105 पाणी स्त्रोतांची तपासणी |
आयुर्वेदिक गार्डनचा वॉकिंग ट्रॅक सुरू करण्याची मागणी |
तरुणांनी उद्योगविश्वात गरुड झेप घ्यावी |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एकास मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |

साताऱ्यात इयत्ता १२ वीच्या परीक्षेत मुलींची बाजी |
वडूज पंचायत समितीचा विस्तार अधिकारी लाच लुचपतच्या जाळ्यात |
खिडकीचे गज वाकवून लॅपटॉपची चोरी |
रामाचा गोट येथून युवक बेपत्ता |
विरळी येथे युवकाची आत्महत्या |