07:26pm | Jul 09, 2018 |
सातारा : गेली अनेक दशके फलटणच्या नागरिकांचे आर्थिक शोषण करणारी अवैध सावकारी जमात आता राज्यकर्ती झालेली आहे. ‘तोडा-फोडा आणि राज्य करा’ ही ब्रिटीशनीती अवलंबून फलटणमधील अवैध सावकार व्हाईट कॉलर माफिया झाले आहेत. अवैध सावकारीच्या माध्यमातून मिळालेल्या पैशातून राजकारण, व राजकारणाच्या माध्यमातून गुन्हेगारी हे सूत्र फलटणच्या पुढार्यांच्या खांद्याला खांदा लावून फलटणमध्ये राबविले जात आहे. त्यामुळे फलटणकरांना जगणे मुश्किल झाले आहे.
फलटण तालुक्यात आणि जिल्ह्यात अवैध सावकारी करणार्यांच्या मुसक्या गेल्या वर्षी पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी आवळलेल्या होत्या. फलटणमधील विद्यमान नगरसेवक, अवैध सावकार सध्या मोक्कान्वये कारवाई झाल्यामुळे कारागृहात सडत पडले आहेत. मात्र तरीही काहीजणांनी अज्ञातवासात जावून आपली कातडी वाचविण्याचा प्रयत्न केला होता. हेच अज्ञातवासात गेलेले सावकार आता फुरफुरु लागले आहेत. काल दि. 8 रोजी फलटणमध्ये व्याजाने घेतलेल्या पैशांसाठी मोलमजुरी करुन कुटूंब चालविणार्या नितीन रमेश चांडक या युवकाचे अपहरण करुन व पिस्तुल लावून त्याला गंभीर मारहाण करण्यात आली होती. यामध्ये फलटण येथील कुख्यात सावकार युवराज किसन पवार (पाटील) व त्याचा भाऊ प्रसाद किसन पवार (पाटील) या दोघांनी चांडक याचे फलटणमधील भर रस्त्यातून अपहरण केले. त्यानंतर सातारारोड लगत असणार्या पुलाशेजारील अंधारात नेवून त्याला लोखंडी पाईप, फायटर व लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या चांडक याला जिंती नाक्यावर एखाद्या कचर्याप्रमाणे फेकून देण्यात आले. पोलीस अधीक्षक संदीप पाटील हे जिल्ह्याचे पोलीस प्रमुख असताना या गुन्हेगारांची एवढी हिंमत झालीच कशी? असा प्रश्न निर्माण होतो.
परंतू फलटणच्या पुढार्यांचा वरदहस्त असल्यामुळे हे अवैध सावकार पुन्हा शेफारलेले आहेत. आता त्यांच्या मुसक्या आवळायलाच हव्यात. फलटणचा बिहार करणार्यांना आतापर्यंत पोलिसांनी त्यांची जागा दाखवली आहे. परंतू 24 तास दारुच्या नशेत तर्रर असणार्या युवराज पवार (पाटील)ची गेल्या काही दिवसांपासून मग्रुरी वाढलेली आहे. याच युवराज पवारने व मोक्क्यात कारागृहात सडत असलेल्या विद्यमान नगरसेवक सनी अहिवळे यांनी सुमारे दोन वर्षापूर्वी कर्तव्य बजावत असणार्या दोन पोलीस कर्मचार्यांना येथील आंबेडकर चौकातच बेदम मारहाण केली होती. परंतू सभापती फलटण नरेशांनी आपले ‘वजन’ वापरुन या दोघांनाही वाचविण्याचे काम केले होते. त्यामुळे फलटणमधील अवैध सावकार पोलिसांनाही जुमानत नव्हते. काल झालेल्या मारहाणीत युवराज पवार-पाटील, त्याचा भाऊ प्रसाद व आणखी अनोळखी तिघाजणांची नावे समोर येत आहेत. भविष्यात सामान्य माणसाच्या अंगाला हात लावण्याची हिंमत या दोघांनी केली नाही पाहिजे, असा धडा जिल्हा पोलीस प्रमुख संदीप पाटील यांनी त्यांना शिकवायला हवा.
फलटणचा बिहार करु पाहणार्या प्रवृत्तींना ठेचायची आता वेळ आलेली आहे. युवराज व त्याचा भाऊ प्रसादची गुन्हेगारी कुंडली पोलिसांनी आता ओपन करायला हवी. किमान डझनभर गुन्हे तरी या दोघांच्या नावे आरामात सापडणार आहेत. जिल्हा पोलीस प्रमुखांनी नुकतेच मोक्क्याचे शतक साजरे केले आहे. काल झालेल्या मारहाण प्रकरणात पोलिसांनी गंभीरपणे खोलात जावून तपास केल्यास फलटण येथील सोमवार पेठेतील अनेक खाजगी सावकारांची नावे यानिमित्ताने ओपन होणार आहेत. ज्या लोकांनी गरीब, शेतकरी, पिचलेल्या लोकांची शोषण व पिळवणूक करुन इमले बांधले, कोट्यवधींची संपत्ती गोळा केली. या लोकांवर कायद्याचा आसूड चालविण्याची वेळ आलेली आहे. फलटणमधील याच अवैध सावकारांनी पैशाच्या जोरावर पोलीस यंत्रणा, फलटणमधील पुढार्यांना खिशात ठेवून त्याचा अंमल फलटणमध्ये अनेक वर्षे चालवला. अशांची पालखी जिल्हा पोलीस प्रमुख संदीप पाटील यांनी उचलायलाच हवी.
फलटण शहर पोलीस ठाणे विसर्जित करण्याची वेळ आली हो...
गेली अनेक वर्षे वादाचा केंद्रबिंदू राहिलेले फलटण शहर पोलिसांकडून शोषित, पीडित, वंचितांना अद्यापपर्यंत कधीच न्याय मिळालेला नाही. येथे कितीही प्रामाणिक अधिकारी आला तरी राजकीय हस्तक्षेपामुळे भ्रष्ट व्हावेच लागते. खून, बलात्कार, दरोडे, मारामारी हे शब्द फलटण शहर पोलीस ठाण्याला नवीन नाहीत. मात्र, फलटण पोलिसांकडून अशा शब्दांचा स्वहितासाठी बेमालूमपणे वापर केला जातो. गुंडपूंड, अवैध सावकारांना रेड कार्पेट, मात्र शोषित, पीडित, वंचितांना बाहेरचा रस्ता. या पॉलिसीमुळे फलटण शहर पोलीस ठाणे गेल्या अनेक वर्षांपासून बदनाम झाले आहे. वरिष्ठ पोलीस अधिकार्यांची दिशाभूल करुन फलटण शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी कोडगे झालेले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा करणेसुद्धा दुरापास्त झाले आहे. त्यामुळे ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ या पोलीसांच्या ब्रिदाप्रमाणे फलटण शहर पोलीस ठाण्याचा कारभार चालत नाही. काल नितीन चांडक या युवकाचे अपहरण करुन मारहाण करणार्या आरोपींना अटक न करता फिर्यादीलाच पोलीस ठाण्यातून हाकलून लावणार्या पोलिसांकडून अजून न्यायाची अपेक्षा करणार तरी कशी? त्यामुळे हे बिनकामाचे पोलीस ठाणे विसर्जित करण्याची वेळ आता आलेली आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |