05:09pm | Jul 20, 2018 |
सातारा : गेली सात वर्षे सातारकरांच्या जिवनाचे अविभाज्य घटक बनलेली व सातार्याचे नाव सातासमुद्रापार पोहोचविणारी सातारा हिल हाफ मॅरेथॉन अव्याहतपणे सुरु आहे. यामुळे काही लोकांना उगाचच पोटशूळ उठलेला आहे. उठसूट कोणत्याही गोष्टींची पत्रके काढायची आणि सातारा हिल हाफ मॅरेथॉनच्या संयोजकांवर खोटे आरोप करुन आपल्या पदरात काही पडतंय का, याची चाचपणी करायची. मात्र, अशा उद्योगांमुळे सातारा हिल हाफ मॅरेथॉन बंद पडणार नाही. उलट आम्ही नव्या दमाने पुन्हा दरवर्षी सातारा हिल हाफ मॅरेथॉनचे संयोजन करु, अशी माहिती सातारा रनर्स फौंडेशनच्या पदाधिकार्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
काल दि. 19 रोजी येथील माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी पत्रकार परिषद घेवून सातारा हिल हाफ मॅरेथॉनच्या संयोजन कमिटीवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. तसेच हाफ मॅरेथॉन असोसिएशनचा भ्रष्टाचार उघड होवू नये म्हणून हाफ मॅरेथॉन असोसिएशन बरखास्त करण्याचा घाट घातला आहे. तसेच हाफ मॅरेथॉन असोसिएशनच्या कारभाराविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले होते. याला उत्तर म्हणून आज सातारा रनर्स फौंडेशनने प्रसिद्धीपत्रक काढून सुशांत मोरे यांनी केलेले आरोप खोडून काढलेले आहेत. सातारा हिल हाफ मॅरेथॉन चे संयोजन आम्ही गेली 7 वर्षे करीत आहोत. मॅरेथॉन असोसिएशन सातारा नावाने धर्मादाय आयुक्त सातारा यांच्याकडे आमची संस्था 2012 सालापासून नोंदणीकृत आहे. सर्व सातारकरांचे प्रेम व सहकार्य मिळाल्यामुळे सातत्याने यशाची अनेक शिखरे पादाक्रांत केली व या निमित्ताने सातार्याच्या नावलौकिकात भर घालून आपल्या जन्मभूमीच्या ऋणातून काही प्रमाणात उतराई होण्याचे सौभाग्य लाभले. हजारो लोकांमध्ये व्यायाम व आरोग्याच्या महत्वाची नवी जाणीव निर्माण झाली.
असे करीत असताना, अनेक अडचणींचा सामना केला, विशेषतः सुरुवातीच्या काळात आर्थिक बाजू सांभाळण्यासाठी प्रसंगी पदरमोड करून स्पर्धेचा डोलारा सांभाळला. तिसर्या वर्षापासून बर्यापैकी स्थिरता यायला लागली. नेटके संयोजन व शिस्तबद्ध नियोजन यामुळे नावलौकिक वाढला व चांगले प्रायोजक मिळाल्यामुळे जमा खर्चाचा ताळेबंद जुळून यायला लागला. यातूनच स्पर्धेव्यतिरिक्त सामाजिक जाणिवेतून इतरही अनेक उपक्रमांना सातत्याने बळ दिले. कधीच या सर्वांचा गवगवा केला नाही. सर्व स्तरातून पाठिंबा व कौतुक होत असताना संकुचित मनोवृत्तीच्या काही मोजक्या लोकांकडून मात्र वैय्यक्तिक स्वार्थ व असूयेपोटी जवळ जवळ प्रत्येक वर्षी काही न काही निमित्त करून त्रास देण्याचा प्रकारही सुरूच असतो.
गेल्याच वर्षी सुशांत मोरे यांनी धर्मादाय आयुक्त सातारा यांच्याकडे अर्ज करून आमची चौकशी करण्याची मागणी केली होती. या तक्रारीची दखल घेऊन मा. धर्मादाय आयुक्तांनी याप्रकरणी सखोल चौकशी करून चौकशी अंती असा निष्कर्ष दिला की मोरेंच्या तक्रारीत कोणतेही तथ्य नाही. किंबहुना तक्रारदाराने त्यांना वारंवार नोटिसा देऊनही एकदाही त्यांच्या आरोपांचे समर्थनार्थ कोणताही पुरावा सादर केला नाही, व चार वेळा तारखा देऊनही एकदाही साक्ष किंवा माहिती/ पुरावे देण्यासाठी हजर राहिले नाहीत. आम्ही काही दोष नसतानाही आमचे उद्योग धंदे सोडून निष्कारण कोर्टाच्या फेर्या मारत बसलो.
शेवटी धर्मादाय आयुक्तांनी असा अंतिम निकाल दिला की मॅरेथॉन असोसिएशन सातारा या संस्थेने स्थापनेपासून आजतागायत सर्व हिशेबपत्रे दाखल केल्याचे स्पष्ट दिसून येते, तसेच संस्थेच्या पदाधिकार्यांनी न्यासास क्षती पोहचेल असे कुठलेही कृत्य केलेले नाही. तसेच तक्रारदार सुशांत मोरे यांनी निरीक्षक अहवालावर अनेकवेळा संधी देऊनही कुठलेही म्हणणे सादर केले नाही तसेच तक्रारीपृष्टयर्थ कुठलाही पुरावा सादर केला नाही. एकंदरीत तक्रारदाराने केलेल्या तक्रारींमध्ये कुठल्याही प्रकारचे तथ्य नसल्याचा स्पष्ट निकाल दिला आहे.
आता पुन्हा एकदा श्री मोरे यांनी काल पत्रकार परिषद भरवून भ्रष्टाचाराचे आरोप नव्याने केले आहेत. आमचे म्हणणे एवढेच आहे की जे आरोप केले आहेत ते सिद्ध करून दाखवा नाहीतर आम्हीच आता तुमच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करू. एक कोटी रुपये शैक्षणिक सदराखाली दाखवले म्हणता, अहो सबंध स्पर्धेचा एकूण खर्चच जवळपास एक कोटीच्या आसपास आहे. सगळाच खर्च चुकीच्या सेक्शन खाली दाखवलाय तर मग एवढा मोठा कार्यक्रम फुकटच झाला काय ?
अहवाल पुन्हा नीट वाचून पहा किंवा कुणाकडून तरी वाचून व समजून घ्या. सदरचा खर्च हा शैक्षणिक नव्हे तर संस्थेच्या उद्दिष्टांवर खर्च असा नमूद आहे. तुमच्या डोळ्यातच खुसपट असल्यामुळे तुम्ही तुमच्या सोयीचा अर्थ लावताय. महत्वाचे म्हणजे नुसते आरोप करून मोकळे होऊ नका, पाठपुरावा करा आणि आमचा गुन्हा सिद्ध करून दाखवा. नुसतीच गाजराची पुंगी वाजवून बघू नका दर वेळेला.
तुमच्या मनासारखा निकाल द्यायला न्यायव्यवस्था कुणाच्या दावणीला बांधलेली नाहीये, त्यामुळे यंत्रणेवर दबाव टाकून निकाल आमच्या बाजुने लागला म्हणता, हा केवळ कोल्ह्याला द्राक्षे आंबट लागण्यासारखा प्रकार आहे. न्यायालयाने दिलेला निकाल चुकीचा आहे असे तुम्हाला म्हणायचे आहे तर तसे सिद्ध करून दाखवा, नाहीतर तो न्यायालयाचा अवमान ठरेल. वास्तव असे आहे की आम्ही सर्व संयोजक हे आमचे नोकरी, व्यवसाय सांभाळून वेळात वेळ काढून या सामाजिक उपक्रमासाठी झटत आहोत. धर्मादाय आयुक्त व सार्वजनिक न्यास या संस्थेचा कारभार हा बहुतांशी कागदोपत्री चालतो, व वेळोवेळी लहानसहान बाबींसाठीसुद्धा वारंवार कार्यालयात जावे लागते, प्रशासकीय पद्धतीने चाललेल्या या सर्व गोष्टींसाठी खरंतर आम्हाला वेळच मिळत नाही. त्यामुळे सर्वकाही व्यवस्थित, प्रामाणिकपणे व जबाबदारीने करूनही लहानसहान बाबींमध्ये कागदोपत्री किरकोळ त्रुटी राहण्याचा संभव असतो.
त्यामुळे आम्ही धर्मादाय आयुक्तांकडील आमची नोंदणी रद्द करण्याचा अर्ज दिलेला आहे. आयुक्तांना जर यात काही आपत्ती असेल तर ते निश्चितच याला परवानगी देणार नाहीत. आणि मोरेंना किंवा आणखी कोणाला यावर आपत्ती असेल तर त्यांनी खुशाल हरकत नोंदवावी. आम्ही मॅरेथॉन चे काम आता सातारा रनर्स फौंडेशन या नव्या नावाने सुरु ठेवणार आहोत. या संस्थेची नोंदणी सेक्शन 8 (पूर्वीची सेक्शन 25 )कंपनी ऍक्ट खाली ना नफा ना तोटा तत्वावर ही संस्था नोंदणीकृत करून घेतली आहे. सेक्शन 8 कंपनी मध्ये कोणतेही भागभांडवल नसते, सभासदांना कोणत्याही प्रकारचा वैयक्तिक नफा किंवा डिव्हिडंड घेता येत नाही. आजमितीला देशात हजारो अशा स्वयंसेवी संस्था आहेत ज्या या तरतुदीखाली आरोग्य, क्रीडा, कला, विज्ञान, धार्मिक, पर्यावरण व निसर्ग अशा अनेक क्षेत्रात उत्तम काम करीत आहेत. आम्ही सातार्यातील व्यावसायिक तसेच हौशी धावपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी आमचे काम सुरूच ठेवणार आहोत. म्हणजे नाव बदलले पण उदिष्ट तेच आहे, यामागची भावना व माणसं तीच आहे. हल्ली सातार्यातील काही लोकांना काहीच काम नसते. उगाचच कोणत्याही अपुर्या ज्ञानाने उणीदुणी काढत बसायची आणि आपले हित साध्य करायचे. मात्र, सातारा हिल हाफ मॅरेथॉनचा कारभार प्रथमपासूनच पारदर्शक आहे. त्यामुळे संबंधितांनी नसती उठाठेव करण्याची आता गरज नाही, असा जोरदार पलटवार सातारा रनर्स फौंडेशनच्या पदाधिकार्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे लगावला आहे.
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |