सातारा : येथील सातारा सैनिक स्कूलमध्ये बारावीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याचा रविवारी सैनिक स्कूलमध्ये असणाऱ्या पोहण्याच्या तलावात बुडून मृत्यू झाला. कुणाल वाणी असे बुडून मृत्यूमुखी पडलेल्या विद्यार्थ्याचे नाव असून तो मुळचा नाशिक येथील असून सहावीपासून तो सैनिक स्कूलमध्ये शिक्षण घेत होता. रविवारी सांयकाळच्या सुमारास ही घटना घडली असल्याची माहिती सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
याबाबत जिल्हा रुग्णालय आणि रुग्णालयात उपस्थित असलेल्या कुणालचे नातेवाईक, मित्रपरिवाराकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, कुणाल कृष्णा वाणी (वय १७) हा नाशिक येथील होता. सातारा सैनिक स्कूलमध्ये सहावीपासून तो शिकत असून आता तो बारावीच्या वर्गात शिकत होता. त्याचे वडील नाशिक येथे जलसंपदा विभागात आहेत तर थोरला भाऊ पुणे येथे शिक्षण घेत आहे. शनिवारी त्याचे वडील कृष्णा त्याला सैनिक स्कूलमध्ये येवून भेटून गेले होते. थोरल्या भावानेही रविवारी दुपारी दीडच्या सुमारास फोन करुन त्याच्याशी संवाद साधला होता. यावेळी त्यांने पेपर चांगले गेले असून सर्व काही ठिक असल्याचे सांगितले होते. त्यानंतर काही तासांतच ही घटना घडल्यामुळे सारेच अचंबित झाले आहेत.
सातारा सैनिक स्कूलमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पोहण्यासाठी तलाव असून रविवारी तो बंद असतो. पोहण्याच्या तलावाचा दरवाजा बंद असल्यामुळे काही मुले भिंतीवरून आता तलावात पोहण्यासाठी उतरली होती. नेमके याचवेळी पोहताना कुणाल बुडाला. याची माहिती मिळाल्यांनतर सातारा सैनिक स्कूल प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्याला तत्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात आणले. मात्र, त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. त्याचा मृतदेह रुग्णालयात ठेवल्यानंतर सैनिक स्कूलमधील अधिकारी निघून गेले असल्याचे जिल्हा रुग्णालयातील पोलीस चौकीतून सांगण्यात आले.
दरम्यान, कुणालला जिल्हा रुग्णालयात दाखल केले असल्याची माहिती वडील कृष्णा यांना देण्यात आली होती. वडिलांनी ही माहिती पुणे येथे शिक्षण घेत असलेल्या त्याच्या थोरल्या भावाला दिली. कुणालचा भाऊ येथे येण्यापूर्वी सैनिक स्कूलमध्ये शिक्षण घेणाऱ्या काही मुलांचे पालक आणि नातेवाईक कुणालची माहिती मिळाल्यानंतर तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते. यांनतर थोड्या वेळातच कुणालचा थोरला भाऊ आपल्या मित्रांसमवेत जिल्हा रुग्णालयात आला होता. यावेळी सैनिक स्कूलमधील कोणीही जिल्हा रुग्णालयात उपस्थित नव्हते. जिल्हा रुग्णालयातील पोलिसांकडून अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडूनही माहिती सांगण्यास नकार देण्यात आला. कुणालच्या अनुषंगाने अधिकृतपणे माहिती देण्यासाठी सैनिक स्कूलमधील कोणीही उपस्थित नसल्यामुळे येथे पहिल्यांदा माहिती दिली जात नव्हती. मात्र, कुणालचा थोरला भाऊ आणि त्याचे मित्र येथे आल्यानंतर त्यांनी कुणालला जिल्हा रुग्णालयात कुठे ठेवले आहे, याची माहिती देण्यात आली. यानंतर त्यांनी जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि नेमके काय घडले आहे, याची माहिती घेतली. यानंतर काही पालक आणि कुणालच्या भावाच्या मित्रांनी सैनिक स्कूलमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. यावेळी सातारा शहर पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचारीही पीसीआर सह जिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते.
दरम्यान, रात्री उशिरा कुणालचे कुटुंबीयही नाशिकहून सातारकडे येण्यासाठी निघाले होते. कुणालबाबत नेमकी काय घटना घडली याबाबतची माहिती रात्री उशिरापर्यंत सैनिक स्कूलमधील सुत्रांकडून देण्यात आली नव्हती. त्याचा पोहताना बुडून मृत्यू झाला असल्याचे जिल्हा रुग्णालयातून सांगण्यात आले होते. याबाबत नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सातारा शहर पोलीस ठाण्यात सुरू होती.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |