12:46am | Jan 11, 2020 |
वाई : 'काळूबाईच्या नावानं चांगभलं ' च्या जयघोषात मांढरदेवी (ता वाई)गडावरील काळूबाईची यात्रेला आज मोठ्या उत्साहात सुरवात झाली. या यात्रेला महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातील मोठ्या प्रमाणात भाविक गडावर दाखल झाले आहेत. शाकंभरी पोर्णिमेला शुक्रवारी देवस्थान ट्रस्टचे मुख्य प्रशासक तथा जिल्हा न्यायाधीश राजेंद्र दत्तात्रय सावंत यांच्या हस्ते काळेश्वरी देवीची विधिवत महापुजा करण्यात आली.
पौष पौर्णिमा हा यात्रेचा मुख्य दिवस असल्याने आज देवीची सुवर्ण अलंकारासह आकर्षक पूजा बांधण्यात आली. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई व फुलांची सजावट करण्यात आली आहे. यात्रेत भाविकांना दर्शन सुलभ होण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. त्याच्या नियोजनासाठी देवस्थान ट्रस्ट, ग्रामपंचायत, यात्रा समिती,तसेच प्रशासनाच्या विविध विभागांचे कर्मचारी यांनी गडावर तळ ठोकला आहे.मांढरदेवकडे येणाऱ्या भोर येथील अबडखिंड घाट व वाई मार्गावर विविध पथकांची नजर आहे. यात्राकाळात पशुहत्या, दीपमाळेत तेल टाकणे, तसेच झाडांवर लिंबू खिळे ठोकून केल्या जाणाऱ्या जादूटोणा प्रकारांना आळा घालण्यासाठी कर्मचाऱ्यांची विविध पथके लक्ष ठेवून आहेत. यात्रेच्या अनुषंगाने पशुसंवर्धन व पोलिस विभागाची पथके वाहनांची तपासणी करीत आहेत. पशूव कोंबड्या यात्रेच्या ठिकाणी जाऊ नयेत, याची काळजी घेतली जात आहे. गुरुवारी रात्री देवीचा जागर झाला. या जागराला देवीची मानाची पालखी गावातून वाजत गाजत मंदिरात आली होती. काल रात्री देवीची छबिना मिरवणूक गावातून काढण्यात आली होती. ढोल-ताशा गजरात अनेक भाविकांच्या उपस्थितीत देवीची गाव प्रदक्षिणा पूर्ण होऊन पहाटेच्या सुमारास पालखी मंदिराच्या पारावर आली आणि भाविकांची एकच झुंबड दर्शनासाठी उडाली. त्यानंतर पहाटे साडेपाचच्या दरम्यान प्रशासनाच्या वतीने मुख्य पूजा झाली.
यावेळी जिल्हा प्रकल्प अधिकारी देविदास ताम्हाणे, पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप यादव, वनक्षेत्रपाल महेश झांजुर्णे, सार्वजनीक बांधकाम उपअभियंता श्रीपाद यादव, वीज वितरणचे उपकार्यकारी अभियंता अविनाश खुस्पे, शाखा अभियंता अजयसिंग यादव, उपशाखा अभियंता सचीन मोरे, योगेश कराडे, राजेंद्र रासकर, सरपंच सौ. अनिता मांढरे, उपसरपंच शंकर मांढरे उपस्थित होते.
२००५ मध्ये घडलेल्या दुर्घटनेनंतर या गडावरील संपूर्ण यात्रा ही शासकीय यंत्रणेकडून पार पाडली जाते. शनिवारी उत्तर यात्रा आहे. पण हि यात्रा पुढे एक महिना चालते.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |