सातारा : सातार्यातील जुना मोटर स्टँड परिसरातील झालेल्या वादाप्रकरणी खा. उदयनराजे भोसले व यांच्यासह सुमारे 25 समर्थक गुरुवारी दुपारी सातारा जिल्हा न्यायालयात हजर राहिले. स्वत: खासदारच न्यायालयात दाखल झाल्याने पोलिसांची पळापळ झाली. दरम्यान, दुपारी त्यांच्यासह त्यांचे कार्यकर्ते व आमदार गटातील कार्यकर्ते अशा एकूण 25 जणांना दोन्ही गुन्ह्यात जामीन मिळाला.
खा.उदयनराजे भोसले, किशोर शिंदे, इर्शाद बागवान, समीर खुटाळे, सत्यजित खुटाळे, पद्माकर खुटाळे, महेश शिंदे, मयुर चिकणे, विक्रम शेंडे, केदार राजेशिर्के, सुरज अवघडे, सुनील भोसले, सुहास रणदिवे, मनोज बडेकर, गणेश जाधव, संदीप शिंदे असे खासदार गटातील जामीन घेतलेल्यांची नावे आहेेत. आ.शिवेंद्रराजे गटातील रवि ढोणे, योगेश चोरगे, विरेंद्र ढोणे, गजेंद्र ढोणे, विजय देशमुख, अक्षय कांबळे यांचा समावेश आहे.
सोमवारी दुपारी जुना मोटर स्टँड येथे दारूच्या दुकानासमोर खा. उदयनराजे व आ. शिवेंद्रराजे भोसले दोघे कार्यकर्त्यांसह समोरासमोर आले होते. यावेळी दोन्ही बाजूचे त्यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात असल्याने वातावरण तंग झाले. एका वर्षापूर्वी सुरुची राड्याची पुनरावृत्ती होते की काय असेच वातावरण निर्माण झाल्याने सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनुचित प्रकार टळला. या सर्व प्रकाराची पोलिसांनी गंभीर दखल घेत स्वतः एक तक्रार दिली व आ. शिवेंद्रराजे भोसले समर्थक यांनी एक असे एकूण दोन गुन्हे दाखल झाले. सातार्यात सोमवारी घडलेल्या या अभूतपूर्व घटनेनंतर बुधवारी आमदार गटासह खासदार गटातील संशयितांनी थेट पोलिस ठाण्यात हजर राहून अटक करुन घेतली. यामुळे दिवसभर त्याकडे सर्वांचे लागले होते. सोमवारी सुरू झालेला हा सिलसिला चौथ्या दिवशी सुरू राहीला. जिल्हा दंडाधिकारी यांचा जिल्ह्यात जमावबंदी आणि शस्त्रबंदीचा आदेश लागू असताना संशयितांनी बेकायदा जमाव जमवून एकत्र आल्याप्रकरणी व तसेच रवी ढोणे यांना जीवे मारण्याची धमकी असे दोन गुन्हे खा. उदयनराजे भोसले यांच्यावर दाखल आहेत.
दाखल असलेल्या या दोन्ही गुन्ह्यामध्ये गुरुवारी दुपारी खा.उदयनराजे भोसले हे समर्थकांसह जिल्हा न्यायालयात हजर राहिले. या घटनेमुळे न्यायालयात बघ्यांची गर्दी झाली. दरम्यान, दोन्ही पक्षाचा युक्तिवाद झाल्यानंतर त्यांना जामीन झाला. बचाव पक्षाच्यावतीने ऍड.संदेश कुंजीर, ऍड. अंकुश जाधव, ऍड.मंदार तातोडकर यांनी काम पाहिले.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |