ब्यूनॉस आयर्न्स : अर्जेंटिना येथे सुरु असलेल्या स्पर्धेत भारताच्या युवा हॉकीपटूंना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. भारताच्या पुरुष आणि महिला दोनही संघाने रौप्य पदक पटकावत भारताची पदकसंख्या १० वर पोहोचवली. भारताचा पुरुष संघ मलेशियाकडून पराभूत झाला. तर महिला संघाला यजमान अर्जेंटिनाकडून हार पत्करावी लागली.
मलेशियाशी झालेल्या सामन्यात भारताला ४-२ अशी हार पत्करावी लागली. कर्णधार विवेक सागर प्रसाद याने भारताकडून तिसऱ्या आणि सहाव्या मिनिटाला गोल केला. तर फिरदौस रोस्दीने ५व्या मिनिटाला गोल केला. त्यामुळे पूर्वार्धात भारत २-१ ने आघाडीवर होता. मात्र उत्तरार्धात मलेशियन बाजी पलटवली. अझीमुल्ला अनुअर याने १४व्या आणि १९व्या मिनिटाला तर अरिफ इशाकने १७व्या मिनिटाला गोल करून मलेशियाला ४-२ असा विजय मिळवून दिला.
युवा महिला संघालादेखील स्पर्धेत रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. यजमान अर्जेंटिनाने भारताला ३-१ असे पराभूत केले. भारताकडून मुमताज खानने सामन्याच्या पहिल्या मिनिटाला गोल करून भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. पण त्यानंतर भारताला एकही गोल मारणे शक्य झाले नाही. याउलट यजमान अर्जेंटिनाकडून जिनेला पॅलेटने ७व्या, सोफिया रॅमॅलो ९व्या आणि ब्रिसा ब्रगसरने १२व्या मिनिटाला गोल करून अर्जेन्टिनाला विजय प्राप्त करून दिला.
भारताच्या १० पदकांमध्ये ३ सुवर्ण आणि ७ रौप्य पदकांचा समावेश आहे. यादीत सध्या भारत १०व्या स्थानी आहे. तर रशिया ४३ पदकांसह पहिल्या, हंगेरी २१ पदकांसह दुसऱ्या आणि चीन २५ पदकांसह तिसऱ्या स्थानी आहे.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |