जुगार अड्ड्यावर छापा
२२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त; ८ जणांवर गुन्हा
सातारा : काशीळ (ता.सातारा) येथे चोरट्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून बोरगाव पोलिसांनी सुमारे २२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोलिसांनी ८ जणांवर गुन्हा दाखल केला.
काशीळ येथील वडारणीचा ओढा नावाच्या शिवारात तीन पानी जुगार सुरू असल्याची माहिती सपोनि चंद्रकांत माळी यांना समजली होती. सोमवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास सहाय्यक फौजदार कुंभार,हवालदार राजू शिंदे व चेतन बगाडे यांना घेऊन त्यांनी तेथे छापा टाकला.
यावेळी जुगार खेळताना पोलिसांनी अविनाश युवराज कांबळे, उमेश पांडुरंग पवार, रज्जाक कादर पठाण, शरद बाजीराव जाधव, बाबू इंगळे, विष्णू संपत माने, हुसेन दिलावर कागदी (सर्व रा.काशीळ,ता.सातारा) व बापू कदम (रा.कोपर्डे,ता.सातारा) यांना ताब्यात घेतले. यावेळी घटनास्थळावरून पोलिसांनी एक दुचाकी, रोख रक्कम व जुगार साहित्य असा सुमारे २२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. पुढील तपास सहाय्यक फौजदार पायमल करत आहेत.
काशीळ (ता.सातारा) येथे चोरट्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून बोरगाव पोलिसांनी सुमारे २२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोलिसांनी ८ जणांवर गुन्हा दाखल केला.