01:52am | Feb 17, 2019 |
सातारा : मालखेड, ता. कराड, जि. सातारा येथे दि. ११ रोजी उसाच्या शेतामध्ये केलेल्या युवकाच्या खून प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने कर्नाटकातून एक जणाला अटक केली असून संबंधिताने खुनाची कबुली दिली असल्याची माहिती अप्पर पोलिस अधीक्षक धीरज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
धीरज पाटील म्हणाले, दिनांक ११ फेब्रुवारी रोजी मालखेड, ता. कराड येथील सर्विस रोडवरील पुलाजवळ असणाऱ्या उसाच्या शेतामध्ये एका अज्ञात युवकाचा गळा चिरून खून करण्यात आला होता. मृतदेह हात बांधलेल्या अवस्थेमध्ये सापडल्याने ही घटना तातडीने उघडकीस आणण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांना केल्या होत्या. त्यानुसार विजय कुमार यांनी पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जऱ्हाड यांच्या अधिपत्याखाली एक पथक तयार करून या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना केल्या होत्या. प्रसन्न जऱ्हाड यांच्या पथकाने या खून प्रकरणातील मयत स्वप्निल गणेश सुतार (वय २३) रा. सोनार्ली वसाहत, पेठ वडगाव, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर याची ओळख पटवली. तद्नंतर स्वप्नीलचे मित्र व इतर साक्षीदार यांच्याकडे तपास करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याकडून उपयुक्त माहिती प्राप्त झाली नाही. तपासांती स्वप्निल हा १० फेब्रुवारी २०१९ रोजी नवले ब्रिज, पुणे येथून रात्री ९ वाजण्याच्या सुमारास नॅशनल हायवेवरून एका ट्रकमधून कोल्हापूरकडे प्रवास करीत निघाला होता अशी माहिती मिळाली. त्यादृष्टीने तपासावर लक्ष केंद्रित करून पुणे ते कोल्हापूर पर्यंत जाणाऱ्या संपूर्ण संशयित वाहनांची माहिती प्राप्त करून त्यापैकी एक संशयित आयशर ट्रक क्रमांक (केए १६ डी. ०८८३) या वाहनातून स्वप्नील प्रवास करीत असल्याची पडताळणी केली. खेड शिवापूर ते कोल्हापूर किनी टोलनाका या संपूर्ण प्रवासादरम्यान स्वप्निल व संशयित वाहन चालक यांची साखळी जोडल्यानंतर स्वप्निल हा याच आयशर मधून प्रवास करत असल्याचे निष्पन्न झाले. संबंधित आयशर ट्रक मालकाची माहिती प्राप्त करून त्याच्याकडे चौकशी केली असता संदीप शिवशंकरअप्पा बुडगी ( वय २१) रा. चित्रदुर्ग कर्नाटक हा आयशरवर चालक असल्याची माहिती मिळाली. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता लुटमारीसाठी स्वप्निल सुतार याचा खून केल्याची कबुली त्याने दिली असल्याची माहिती धीरज पाटील यांनी दिली.
एसटीनेच प्रवास करा : पोलीस अधीक्षक
नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग व राज्य मार्गावरून प्रवास करीत असताना कोणत्याही अनोळखी वाहनातून प्रवास न करता अधिकृत परिवहन महामंडळाच्या वाहनातूनच प्रवास करावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी यावेळी बोलताना केले. दरम्यान अत्यंत कमी वेळेत आणि पुणे शाखेने या खून प्रकरणाचा छडा लावल्याने त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकत संबंधित अधिकाऱ्यांना रिवार्ड मिळेल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |