खंडाळा : शिंदेवाडी ता.खंडाळा गावच्या हद्दीमध्ये विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह सासू,सासऱ्यांना खंडाळा येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाने १ वर्ष सक्तमजुरी व २ हजार रुपये दंड सुनावला असून दंड न भरल्यास ३ महिने साधी कैद सुनावली आहे. याप्रकरणी पती प्रशांत शिवाजी ढमाळ (वय ३०) ,सासरे शिवाजी विष्णू ढमाळ ( वय ५८ ) , सासू मंगल शिवाजी ढमाळ (वय ५५, सर्व मूळ रा.असवली ता.खंडाळा सध्या रा.शिंदेवाडी ता.खंडाळा ) असे शिक्षा सुनावलेल्या संबंधितांचे नावे आहेत .
याबाबतची मिळालेली माहिती अशी, अंबवणे ता. वेल्हा जिल्हा पुणे यथील कल्पना दत्तात्रय भगत हीचा विवाह मूळ रा.असवली ता.खंडाळा सध्या रा.शिंदेवाडी ता.खंडाळा येथील प्रशांत शिवाजी ढमाळ याच्याबरोबर दि. ११ जुलै २००७ रोजी विरवडी ता. भोर येथील श्रीराम मंदिरामध्ये हिंदूरितीरिवाजाप्रमाणे पार पडला होता. यावेळी लग्नामध्ये कल्पना हिचे वडील दिवंगत दत्तात्रय भगत यांनी १ लाख २५ हजार रुपये हुंडा म्हणून देण्याचे कबुल केले होते. त्यानुसार लग्नाच्यावेळी दत्तात्रय भगत यांनी २५ हजार रुपये हुंडा दिला होता. दरम्यान, दि. १२ जुलै २००७ रोजी लग्नाची पूजा झाल्यानंतर आम्हाला कपड्याच्या दुकान टाकण्यासाठी उरलेल्या १ लाख रुपयांच्या हुंड्याच्या पैशासाठी मागणी केली . यावेळी माहेरहून परत आल्यानंतर कल्पना हीचा पती प्रशांत ढमाळ ,सासू मंगल ढमाळ ,सासरे शिवाजी ढमाळ हे हुंड्याच्या १ लाख रुपये मागणीसाठी उपाशीपोटी ठेवत जाचहाट करत शिवीगाळ करून पैसे घेतल्याशिवाय सासरी यायचे नाही असे सांगून माहेरी पाठवले होते. यावेळी कल्पना हिची माहेरच्या लोकांनी समजूत काढत पुन्हा सासरी पाठविले होते. त्यानंतर पती सासू,सासरे यांनी घराची कढी लावून तिला जबर मारहाण केली. त्यातून स्वतःची सुटका करून गावातील एका घरामध्ये आसरा घेतला व माहेरी निघून गेली . दरम्यान, याबाबत कल्पना ढमाळ हिने तत्कालीन शिरवळ पोलीस दूरक्षेत्रामध्ये जाचहाट , हुंडा व मारहाणप्रकरणी फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार शिरवळ पोलिसांनी गुन्हा दाखल करत पती ,सासू ,सासरे यांच्याविरुद्ध तत्कालीन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक देवेंद्र पाडवी यांनी तपास करून खंडाळा येथील दिवाणी व्फौजदारी न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल केले होते. त्यानुसार सरकारी वकील सुप्रिया मोरे-देसाई यांनी केलेला युक्तिवाद व पुरावे ग्राह्य मानत खंडाळा दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्यायाधीश अजित बी.चव्हाण यांनी संबधितांना दोषी ठरवत एक वर्ष सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंड ठोठावत दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे. याप्रकरणी प्रॉसीक्यूसेशन स्कॉडचे पोलीस हवालदार सुरेशराव मोरे, सुनील गायकवाड ,रवींद्र कदम यांनी सहकार्य केले.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |