सातारा : मराठा समाजाला तातडीने आरक्षण मिळावे यासह अन्य मागण्यांसाठी क्रांतीदिनी म्हणजे दि. 9 ऑगस्ट रोजी सातारा जिल्ह्यातील 11 ही तालुक्यांमध्ये तहसीलदार कार्यालयांसमोर मराठा समाजाच्यावतीने ठिय्या आंदोलन केले जाणार आहे.
मराठा समाजाला आरक्षण देण्यात टाळाटाळ केली जात असल्याबद्दल मराठा क्रांती मोर्चाने निषेध व्यक्त केला असून ऑगस्ट क्रांतीदिनी पुन्हा आंदोलन छेडण्याचा निर्धार केला आहे. पुण्यात झालेल्या आरक्षण परिषदेत खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी आंदोलन शांततेत करण्याचे आवाहन केले आहे. मुख्यमंत्र्यांनी जरी आरक्षणाबाबत विधाने केली असली तरी लेखी स्वरुपात अद्याप काहीही दिलेले नाही. त्यामुळे ऑगस्ट क्रांतीदिनी आंदोलन छेडण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चाने कायम ठेवला आहे. याच धोरणाचा भाग म्हणून सातारा जिल्ह्यात सातारा तालुका वगळता सर्व तहसीलदार कार्यालयांसमोर ऑगस्ट क्रांतीदिनी ठिय्या आंदोलन केले जाईल. 11 ते 3 या वेळेत ठिय्या आंदोलन केल्यानंतर संबंधित प्रशासकीय अधिकार्यांना निवेदन दिले जाईल. शासनाच्या कृतीचा निषेध करुन आंदोलन शांततेत करण्यात येईल. सातारा शहर व सातारा तालुक्यासाठी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी 11 वाजता ठिय्या आंदोलन केले जाणार आहे. सातारा शासकीय विश्रामगृहावर समन्वयकांच्या बैठकीत सर्वमताने आंदोलन शांततेत करण्याचा निर्णय घेण्यात आला. सकल मराठा समाजाने आपापल्या भागातील तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलनात सामील व्हावे, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. तालुका पातळीवरील आंदोलनांची जबाबदारी त्या त्या तालुक्यातील समन्वयकांनी घ्यावी, असेही यावेळी सांगण्यात आले.
सातारा शहर व सातारा तालुक्यातील मराठा समाज बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आंदोलनात सामील व्हावे, ठिय्या आंदोलन करुन शासनाला आपल्या मागण्यांविषयीची जाणीव करुन द्यावी, असे यावेळी ठरवण्यात आले.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |