03:18pm | Nov 17, 2019 |
सातारा : बुधवार नाका येथे शनिवारी सांयकाळी उपविभागीय पोलिस कार्यालय व शाहूपुरी पोलिसांच्या पथकाने जुगार अड्ड्यावर छापा टाकून पाच जणांना अटक केली. संशयितांकडून दुचाकी, मोबाईल, रोकड व जुगाराचे साहित्य असा एकूण १ लाख ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान, सर्व संशयित बुधवार नाका परिसरातील आहेत.
सनी धनाजी भिसे, शिवम विनोद कांबळे, मनोज संपत माने, अजय सदाशिव आवळे, सोमनाथ वायदंडे, शामराव यशवंत कुर्हाडे (सर्व रा.बुधवार नाका) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, बुधवार नाका येथे जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती पोलिसांना समजली. सहाय्यक पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी पोलिसांचे पथक तयार करुन घटनास्थळी छापा टाकला. पोलिसांनी छापा टाकताच संशयितांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. यामुळे परिसरात काही काळ गोंधळ झाल्याने तणाव निर्माण झाला.
रम्यान, पोलिसांनी सर्व संशयितांना ताब्यात घेतले. घटनास्थळाचा पंचनामा करुन सर्व साहित्य जप्त केले. जप्तमध्ये रोख १४ हजार रुपये, दोन दुचाकी, चार मोबाईलचा समावेश आहेे. पोलिसांनी छापा टाकल्याचे समजताच परिसरात बघ्यांची गर्दी झाली. सर्व संशयितांना ताब्यात घेवून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस हवालदार बालम मुल्ला, अंकुश यादव, मंगेश डोंबे, लैलेश फडतरे, हसन तडवी यांनी कारवाईत सहभाग घेतला.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |