सातारा : सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर मंदावला आहे. जिल्ह्याच्या पश्चिम भागात धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची रिपरिप सुरू असून पूर्व भागात दिवसात कधीतरी हलकी पर्जन्यवृष्टी होत आहे. प्रमुख धरणांच्या पाणीसाठ्यात धीम्या गतीने वाढ होत असून कोयना धरणाचा पाणीसाठा ४३.७० टीएमसीवर पोहोचला आहे. पावसामुळे संपूर्ण जिल्हाभर हवेत कमालीचा गारठा जाणवत आहे. गेले काही दिवस जिल्ह्यात समाधानकारक पाऊस होत असल्याने नद्या, नाले, ओढे वाहते झाले आहेत. जिल्ह्यात गेल्या चार दिवसात पाऊस व उघडिपीचा खेळ सुरू आहे. एक दिवस संततधार, तर एक दिवस काहीशी उघडीप असे चित्र आहे. मात्र सतत ढगाळ हवामान असल्याने सूर्यदर्शन दुर्मिळ झाले आहे. त्यामुळे हवेत गारठा वाढला आहे. होत असलेला पाऊस खरीपातील पिकांसाठी उपयुक्त ठरत असल्याने शेतकरी राजा सुखावला आहे. जिल्ह्यातील बहुतांश पेरण्या उरकल्या असून उगवणसुरू झाली आहे.
जिल्ह्यात आज सकाळी आठ वाजेपर्यंतचा व वंâसात आजअखेरचा पाऊस मिलीमीटरमध्ये याप्रमाणे : सातारा ७.९ (२९५.४), जावली १४.१ (४३७.३), पाटण २८.८ (४२१), कराड ८.८ (२१०.९), कोरेगाव ३.१ (१५४.३), खटाव २.६ (१८०.५),
माण ०.९ (८८.५), फलटण ० (९१.७), खंडाळा ०.४ (१४३.५), वाई ५.७ (२३८.४), महाबळेश्वर ८०.५ (१२६८). सकाळी ८ वाजेपर्यंत कोयना धरण पाणलोट क्षेत्रात कोयनानगरला ९२ (१६७२), नवजाला ७३ (१५३९) व महाबळेश्वर येथे ८६ (१३९१)
मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |