कोरेगाव : कोरेगाव मतदारसंघातील पैलवान सचिन शेलार यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भारतीय जनता पार्टीमध्ये ना,चंद्रकांतदादा पाटील, ना.शेखर चरेगावकर, अतुल बाबा भोसले, विक्रम पावस्कर, युवा नेते महेश शिंदे यांच्या उपस्थितीत कराड येथे हजारो कार्यकर्त्यां समवेत पक्ष प्रवेश केला. यावेळी नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी सचिन शेलार यांना शुभेच्छा देवून लवकरच पक्षाची संघटनात्मक जबाबदारी सोपवण्याचे संकेत दिले.
एकसळ ता. कोरेगाव येथील पैलवान सचिन शेलार यांच्याबरोबर हरी सावंत (विसापूर ) बाळासाहेब सावंत फडतरे सर, दत्तात्रय भोसले एकसळ आणि ग्रामपंचायत सदस्य कार्यकर्ते,संजय गायकवाड, प्रशांत जगताप निगडी आणि सर्व कार्यकर्ते, गोडसेवाडी सरपंच नितीन गोडसे आणि सहकारी यांच्यासह संपूर्ण मतदार संघातील कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.
यावेळी तालुकाध्यक्ष संतोष आबा जाधव, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष निलेश नलावडे, शहराध्यक्ष राहुल बर्गे जिल्हा सरचिटणीस रमेश उबाळे, युवा तालुका आध्यक्ष निलेश यादव, युवा शहर आध्यक्ष श्रीकांत बर्गे , राजू माने, सचिन आप्पा साळुंके, श्रीकांत जाधव उपस्थित होते.
निवडी नंतर सचिन शेलार म्हणाले की महेशदादा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कोरेगांव विधानसभा मतदार संघामध्ये परिवर्तन करण्यासाठी अहोरात्र झटून भारतीय जनता पार्टीला विजयी करणार असा निर्धार व्यक्त केला. आजवर राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांनी फक्त नारळ वाढवाले ,विकास केलाच नाही.आम्ही युवा वर्ग शाश्वत विकास करणाऱ्या नेतृत्वाच्या शोधात होतो. तो आम्हाला युवा नेते महेशदादा शिंदे यांच्या रूपाने भारतीय जनता पार्टीमधे दिसला. त्यांनी भाजप शासनाच्या माध्यमातून गेल्या चार वर्षात कोरेगांव विधानसभा मतदारसंघात कोणतीही स्थानिक स्वराज्य संस्था व सत्ता नसतानाही पक्ष नेतृत्वाच्या जोरावर आणि सर्वसामान्य जनतेच्या पाठिंब्यावर बहुसंख्य विकासाची कामे मार्गी लावण्याचे अशक्य काम शक्य करण्याची किमया करीत कायापलट केला आहे. म्हणूनच पुर्ण विचारांती माझ्यासह हजारो सर्वसामान्य लोकांसोबत पक्ष प्रवेश केला आहे. यापुढे पक्षाच्या "सब का साथ सबका विकास" या ध्येयाने वाटचालीसाठी कटीबद्ध असल्याचे सांगितले.
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |