सातारा : सातारा शहर परिसरात पोलिसांनी बुधवारी रात्री दोन ठिकाणी जुगार अड्ड्यांवर छापा टाकून लाजवाब कारवाई करत तब्बल 34 जणांना अटक केली. धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये तडीपार केलेले दोघेजण सापडले असून पोलिसांनी या प्रकरणात सायबर अॅक्टचे कलमही लावले आहे.
अनिकेत चोरगे, पापा गवळी, दिपक पवार, राजेश कोळेकर, सचिन सुपेकर, उदय आमणे, भानुदास देशमुख, रवि विचारे, अक्षय क्षिरसागर, सागर बोभाटे, प्रताप सकटे, भगवान गायवाड या संशयितांना राजवाडा बसस्टॉप परिसरात असलेल्या आडोशास पकडले आहे. तसेच प्रभाकर मिश्रा, वसीम शेख, दिलीपकुमार नाफड, राहूल पंडित, रामदास पंडित, शितेज साठे, संतोष जगताप, नजीद पटवेकर, सागर महामुनी, समीर पठाण, राजेश कदम, मोहसिन पटवेकर, भरत वाघमारे, जयेश भाटकर, सौरभ जाधव, मुक्तार शेख, किरण माने, विजय कांबळे, चंद्रमणी आगाणे, नारायण गायकवाड, दादा भिंताडे, संतोष साळुंखे या संशयितांना सैदापूर येथील सलीम कच्छी याच्या घरात खेळत असताना पकडले आहे.
राजवाडा परिसरात केलेल्या कारवाईतून पोलिसांनी 41 हजार 285 रुपये रोख, मोबाईल व इतर साहित्य जप्त केले आहेत. सैदापूर येथून पोलिसांनी रोख 1 लाख 4337 रुपये, जुगाराचे साहित्य, मोबाईल, वॉटरप्युरीफायर मशिन जप्त केले आहे. अशाप्रकारे दोन कारवाईतून रोख 1 लाख 45 हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे पोलिस उपअधीक्षक गजानन राजमाने यांनी यातील एका गुन्ह्याला सायबर अॅक्टचेही कलम लावल्याने ही दुर्मिळ कारवाई मानली जात आहे. कारण जुगार खेळण्यासाठी चिठ्ठी ऐवजी अलीकडे मोबाईलचाही सर्रास वापर होत आहे. जुगारासाठी मोबाईलचा वापर केला जात असल्याने त्याला सायबर अॅक्ट लावण्यात आला आहे.
दरम्यान, जुगार अड्ड्यांवर सापडलेल्या नावांची माहिती घेतल्यानंतर त्यामध्ये काहीजण तडीपारीत असल्याचेही समोर आले. पोलिसांनी त्याबाबत खातरजमा केली असता प्रभाकर बलदेव मिश्रा (रा.एमआयडीसी) व वसीम इब्राहिम शेख (रा.रविवार पेठ) हे दोघे तडीपार असल्याचे समोर आले आहे.
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |