02:49pm | Dec 22, 2018 |
सातारा : कोरेगाव मतदार संघात माझा पराभव दारु, मटण व पैशाने केला. एकेका मताला दहा- दहा हजार रुपये वाटण्यात आले. आता लोक मला बोलावत आहेत. कोरेगावच्या जनतेची खरोखरच इच्छा असेल आणि प्रकृतीने मला साथ दिली तर कोरेगाव विधानसभा मतदार संघातून मी निवडणूक लढवेन. प्रकृतीने साथ दिली नाही तर कुटुंबातील सदस्य किंवा सक्षम कार्यकर्ता निवडणूक लढवणारच, असा इरादा माजी मंत्री व कोरेगावच्या माजी आमदार डॉ. शालिनीताई पाटील यांनी सातार्यात पत्रकार परिषदेत जाहीर केला.
मुंबईत असलेल्या शालिनीताई अनेक वर्षांनंतर सातार्यात आल्या. शनिवारी त्यांचा मराठा आरक्षणातील योगदानाबाबत सातारारोड येथे जाहीर सत्कार होत आहे. त्या पार्श्वभूमीवर सातार्यात पत्रकार परिषदेत त्यांनी विविध विषयांना हात घातला.
शालिनीताई म्हणाल्या, मीच सर्वप्रथम मराठा आरक्षण या विषयाला तोंड फोडले. त्यावरुन मला राजकीय विजनवासातही जावे लागले. मात्र, मी त्यावेळी केलेली मागणी ही किती योग्य होती हे आता जाहीर झालेल्या आरक्षणावरुन सिद्ध होत आहे. याच मुद्यावरुन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मला पक्षातून बेदखल केले होते. पवारांचे कार्यकर्ते आता त्यांनीच आरक्षण दिल्याचे सांगत सुटले आहेत. हा खोटेपणा आहे, असा आरोपही शालिनीताईंनी केला.
पवारांनी विदर्भातील अनेक प्रकल्पात 70 हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचार केला आहे. त्यावर नागपूर खंडपीठात खटला सुरु असून यांनी कुठे पैसा लपवून ठेवला आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
मी मुंबईतून कोरेगावात आल्यापासून कोरेगाव मतदार संघातील अनेक कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष भेटून आपण पुन्हा सक्रीय व्हा, अशी मागणी केल्याचे स्पष्ट केले. जेवण, दारु, मटण, पैसा यांची रेलचेल झाल्यानेच माझा पराभव झाला. त्याची पुनरावृत्ती होणार नसेल तरच मी स्वत:, कुटूंबातील व्यक्ती किंवा निष्ठावान कार्यकर्त्याच्या माध्यमातून निवडणूक लढवेन. मी आमदार असताना जी कामे झाली त्यानंतर काम झाले नसल्याचे कार्यकर्त्यांनी मला नुकतेच सांगितले आहे. 900 कोटीची कामे मतदार संघात आली असल्याचा डंका पिटला जात असला तरी चार महिन्यात ही कामे मार्गे लागणार का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. खा. उदयनराजे भोसले हे उद्याच्या सत्काराला उपस्थित राहणार आहेत. शेतकर्यांच्या मालकीचा असलेला जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना काही जणांनी गिळंकृत केला आहे. ही बाब न्यायप्रविष्ट असल्याने योग्यवेळी त्यावर बोलेन. कारखाना आपल्या मालकीचा व्हावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे शालिनीताई पाटील यांनी स्पष्ट केले.
यावेळी जरंडेश्वर कारखान्याचे व्हाईस चेअरमन शंकर पाटील, राजेंद्र फाळके, अविनाश फाळके, मधुकर नलावडे, नंदकुमार निकम, सचिन साळुंखे, कुमार फाळके आणि विशाखा पाटील यांची उपस्थिती होती.
संवेदनशील विषयांवर शालिनीताईंना रडू कोसळले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्व. पतंगराव कदम यांची आठवण शालिनीताई यांनी पत्रकार परिषदेत काढली. स्व. कदम हे मंत्री असताना व शालिनीताई या आमदार असताना स्व. कदम यांच्याशीही जवळचे संबध होते. ज्यावेळी आम्हा दोघांची भेट होत होती. त्यावेळी ते मला नेहमी झाशीच्या राणी म्हणत होते. मात्र, आता ते आपल्यात नसल्याने मोठे दु:ख होत आहे. असे सांगत देशात सध्याचा सर्वांत ज्वलंत असणारा राम मंदिराचा प्रश्न घटना समिती, जरंडेश्वर साखर कारखान्याचा विषय, इंदिरा गांधींशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध, वसंतदादा पाटील यांचे राजकारण या विषयांना स्पर्श करताना शालिनीताई यांना रडू कोसळले.
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |