02:13pm | Jun 29, 2019 |
पुणे : कोंढव्यात बहुमजली इमारतीच्या सोसायटीच्या पार्किंगची संरक्षक भिंत मजुरांच्या झोपडपट्टीवर कोसळल्याची धक्कादायक घटना मध्यरात्री घडली आहे. यात पहाटेपर्यंत १७ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. आणखी काही मजूर या ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता आहे. यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. शुक्रवारपासून धो-धो कोसळणाऱ्या पावसामुळे ही घटना घडली आहे. मजुरांची नावे अद्याप समजू शकली नाहीत. ही घटना रात्री २ वाजण्याच्या सुमारास घडला आहे.
कोंढवा येथील तालाब कंपनीसमोर अल्कोंन सोसायटी आहे. या सोसायटी शेजारीच आणखी एका बहुमजली इमारतीचे बांधकाम सुरू आहे. येथील मजुरांनी अल्कोंन सोसायटीच्या पार्किंग संरक्षक भिंतीला लागून या मजुरांनी झोपड्या बांधल्या होत्या. तेथे हे राहत होते. हे मजूर प. बंगाल आणि बिहारचे असल्याचे समजते. पुण्याचे प्रशासकिय अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते.
तत्पूर्वी शुक्रवारपासून शाहरात संततधार पाऊस सुर आहे. यातच संरक्षक भिंत खचली आणि ती या झोपड्यांवर कोसळली. यात आतापर्यंत तब्बल १७ जणांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यात २ लहान मुलांचा समावेश आहे. आणखी काहीजण अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.
या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक, पोलिस दल आणी पालिकेच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी घट्नास्थळी धाव घेतली. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे.
मृतांमध्ये बंगाल आणि बिहारमधील मजुरांचा समावेश आहे. तिघांना जिवंत बाहेर काढण्यात आले आहे. २ ते ३ वर्षापूर्वी इमारतीचे बांधकाम करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
या घटनेला जबाबदार असतील, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. यात कोण सहभागी आहे, हे अद्याप समोर आलेले नाहीत. नागरिकांनी घाबरून जाऊ नये.
- मुक्ता टिळक, महापौर, पुणे
बिल्डर आणि झोपड्या बांधून देणाऱ्यांची प्रथम पाहणीत चुकी असल्याचे दिसत आहे. चौकशी सुरू असून यात दोषी असणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.
- नवलकिशोर राम, जिल्हाधिकारी
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |