कराड : येथील शिक्षण मंडळ कराडच्यावतीने दुसरे विद्यार्थी साहित्य संमेलन व ग्रंथ प्रदर्शन बुधवार, दि. 25 व गुरूवार दि. 26 सप्टेंबर रोजी महिला महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले आहे. संमेलनामध्ये सकाळी 9 ते 11.30 व दुपारी 2.30 ते 5 या वेळेत 4 सत्रात, नामंकित वक्त्यांची व्याख्याने, सुप्रसिध्द कलाकारांचा सांस्कृतिक कार्यक्रम व ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
बुधवार दि. 25 रोजी पहिल्या सत्रामध्ये अध्यक्ष म्हणून डॉ. राजाराम कुंभार (कराड) हे उपस्थित राहणार आहेत. या सत्रात स्वाती राजे(पुणे) यांचा ‘विद्यार्थी संवाद व अभिवाचन’ हा विद्यार्थ्यासाठी कार्यक्रम तसेच संस्थेतील प्राथमिक व संगीत शिक्षकांचा अक्षरबाग हा सांस्कृतिक व त्यानंतर सुरूची वाचनालय, कराडच्या अध्यक्षाा डॉ. शर्वरी बेलापुरे यांच्या हस्ते ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. दुपारच्या सत्रासाठी सुरूची वाचनालयाच्या अध्यक्षा डॉ. शर्वरी बेलापुरे अध्यक्षस्थानी असणार आहेत. या सत्रात आदर्श, विकास व श्रीकृष्ण या तीन विद्यार्थ्यांचा ‘तीन मुलांचे चार दिवस-एक थरारक अनुभव’ हा कार्यक्रम होणार आहे. सुशांत पावशे (कराड) यांचे ‘शिवपुत्र संभाजी’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.
गुरूवार, दि.26 रोजी तिसर्या सत्रासाठी सदगुरू गाडगे महाराज महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ. रेश्मा दिवेकर अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत. या सत्रात येथील सुप्रसिध्द बालरोगतज्ज्ञ डॉ. सुलभा ब्रह्मनाळकर यांचा डॉक्टर म्हणून जगताना व जगवताना या विषयावरील तसेच सातारा अधिकारी गोविंद मोकाशी यांचे साहित्य व आकाशवाणी या विषयावरील मुक्तसंवाद कार्यक्रम होणार आहे. चौथ्या व समारोप सत्रासाठी सुप्रसिध्द डॉ. शंतनू कुलकर्णी (कराड) हे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत. या सत्रात पवन नाटेकर (कराड) यांचे ‘सोशल मीडीयावरची लेखनसीमा’ या विषयावरील व्याख्यान व स्वरदा फडणीस (कोल्हापूर) यांचे ‘एक सावरकरमयी प्रवास’ या विषयावरील व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
2 दिवसांच्या या संमेेलनाचे नियोजन व सूत्रसंचालन टिळक हायस्कू, स्व.शेठ रा.कि.लाहोटी कन्याप्रशाला, इंग्रजी माध्यमाची शाळा (कराड), आत्माराम विद्यामंदिर (ओगलेवाडी) या शाळांमधील विद्यार्थी व विद्यार्थिनी करणार आहेत. या समारंभामध्ये संस्थेतील उत्तम शिक्षक वाचक व उत्तम विद्यार्थी वाचक यांचा शाखानिहाय्य सत्कार करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यानी विद्यार्थ्यांसाठी राबविलेला हा नावीन्यपूर्ण उपक्रम म्हणजेच हे साहित्य संमेलन असल्याने या संमेलनासाठी नागरिकांनी अगत्यपूर्वक उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे चेअरमन बाळासाहेब कुलकर्णी, सेक्रेटरी चंद्रशेखर देशपांडे यांनी केले आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |