कराड : मलकापूर नगरपरिषदेने जागतिक पर्यावरण दिन दि. 5 जून, 2019 निमित्त वृक्ष संवर्धन संकल्प करुन साजरा केला. पर्यावरण दिनानिमित्त नगरपरिषदेच्या अध्यक्षा, उपाध्यक्ष, विविध समितीचे सभापती, मुख्याधिकारी, सर्व विभागाचे विभाग प्रमुख व कर्मचारी, स्वच्छता दूत यांनी सहभाग घेतला. यानिमित्त लक्ष्मीनगर या ठिकाणी स्वच्छतेची व पर्यावरण संवर्धनाअंतर्गत वृक्ष संवर्धनाची शपथ घेणेत आली. तसेच या वेळी महाराष्ट्र शासन कृषि विभागाचे कृषि मंडळ अधिकारी ताकटे साहेब यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करुन वृक्ष लागवड व संगोपन याबाबतचे मार्गदर्शन केले. यावेळी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. निलम येडगे, उपनगराध्यक्ष श्री.मनोहर शिंदे, बांधकाम सभापती श्री. राजेंद्र यादव, नियोजन सभापती दत्ता पवार, महिला व बालकल्याण सभापती सौ.आनंदी शिंदे, उपसभापती सौ. कमल कुराडे, नगरसेवक प्रशांत चांदे, किशोर येडगे, अजित थोरात, नगरसेविका सौ. गितांजली पाटील, सौ. अलका जगदाळे, सौ.नंदा भोसले, सौ.पुजा चव्हाण, मुख्याधिकारी श्रीमती संजीवनी दळवी, सर्व विभागांचे विभाग प्रमुख व कर्मचारी सुट्टीच्या दिवशी सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी कृषि मंडल अधिकारी ताकटे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, दिवसेंदिवस जागतिक तापमान वाढीमुळे होणारा विपरीत परिणाम यापासून सुटका होणेकरिता मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड व संगोपन करणे आवश्यक आहे. मलकापूर नगरपरिषदेने यापुर्वीच हा उपक्रम हाती घेऊन पथदर्शी उपक्रम राबविला आहे. तसेच शेतकर्यांच्यासाठी सुद्धा फळबाग लावणेसाठी प्रोत्साहनपर फळ रोपे दिलेली आहेत. हि बाब कौतुकास्पद आहे. तसेच शासनाच्या बरोबरीने नगरपरिषदेने सुद्धा शेतकर्यांना बियाणे खरेदीसाठी 50% अनुदान जाहिर केले आहे. हि बाब शेतकर्यांच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. नागरिकांनी व शेतकर्यांनी आपल्या परिसरातील झाडे यांची जोपासना वेळीच करावी. रोग होण्यापुर्वी त्याची उपाय योजना करणे आवश्यक असून याकरिता शासनाचा कृषि विभाग कायम उपलब्ध आहे.
यावेळी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष यांनी मनोगत व्यक्त केले, मलकापूर नगरपरिषदेने शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करुन संगोपन केले आहे. यासाठी स्वतंत्र कृषि विभाग कार्यरत आहे. दापोली कृषि विद्यापीठ व राजमंड्री आंध्रप्रदेश येथून चांगल्या प्रतीची वृक्ष रोपे लागवडीसाठी घेतलेली आहेत. त्यामुळे या वृक्षांचे संगोपन अतिशय उत्तमरित्या करणेत येत आहे. यामुळे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सदर वृक्षांचे संगोपन अधिकरित्या होणेकरिता आज नगरपरिषदेने हा निर्णय घेतलेला आहे. मलकापूर शहरात प्रभाग निहाय वृक्ष संगोपनाचा आराखडा तयार करणेत आला असून, याअनुषंगाने आज ह्या मोहिमेअंतर्गत 9 प्रभागात मिळून 2099 झाडांची प्रत्येक प्रभागामधील वृक्ष रोपांना आळी करणे, खत घालणे, ट्रि-गार्ड दुरुस्त करणे, पाणी घालणे इत्यादी कामे करण्यात आली. संबंधित प्रभागातील नगरसेवक यांचेवर जबाबदारी देऊन त्यांच्या सोबत आरोग्य विभाग प्रमुख श्री. रमेश बागल, शहर समन्वयक श्री. पुंडलिक ढगे, कृषि विभाग नितीन पाचुंदकर यांचे विभागातील कर्मचार्यांच्या मदतीने सदरची मोहिम यशस्वी करणेत आली.
मलकापूर नगरपरिषदेने वृक्ष संवर्धन कार्यक्रमाबरोबरच वृक्ष गणना करणेचा निर्णय घेतला असून, नगरपरिषदेने लागवड केलेल्या वृक्ष रोपांना स्वतंत्र रंग देऊन त्या झाडांवर नंबर टाकणेचे नियोजीत केलेले आहे. यामुळे नगरपरिषदेने वृक्ष लागवड केलेल्या कामाचा लेखाजोका मांडता येणार आहे. तसेच वृक्ष संगोपनासाठी 2 अधिकरी व प्रभाग निहाय कर्मचार्यांची स्वतंत्र नियुक्ती करणेत आलेली आहे. जेणेकरुन सदरचा कार्यक्रम हा कायमस्वरुपी राबविणेस मदत होणार आहे. आज मलकापूर शहरामध्ये नव्याने वृक्ष लागवड करणेसाठी 2000 खड्डे काढून तयार आहेत. सदर खड्ड्यांमध्ये 1 जुलैपासून वृक्षारोपन कार्यक्रम हाती घेणेत येणार आहे. यामध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. तसेच आपले घरासमोरील, जागेसमोरील वृक्ष रोपाचे संगोपन स्वत: करावे याबाबत नागरिकांच्या प्रबोधन करणेत येणार आहे.
मलकापूर नगरपरिषदेने वृक्ष लागवडी अंतर्गत शहरातील नागरिकांचे आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त असणारी वृक्ष लागवड करणेचा निर्णय घेतलेला आहे. तसेच ज्या अशासकीय संघटना वृक्ष लागवड कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ ईच्छीता मलकापूर नगरपरिषद कृषि विभाग अब्दूल रशिद पटेल व नितीन निवास पाचुंदकर यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन नगरपरिषदेचे वतीने करणेत आले आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |